कोपरगाव(प्रतिनिधी):- राज्याचे पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आले असता श्री साईबाबा विमानतळावर श्...
कोपरगाव(प्रतिनिधी):-
राज्याचे पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आले असता श्री साईबाबा विमानतळावर श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या वतीने त्यांचे स्वागत केले.
यावेळी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध प्रश्नाबाबत मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत ना. आशुतोष काळे यांनी चर्चा केली. श्री साईबाबा संस्थानच्या वतीने देखील मंत्री ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री साईबाबा संस्थानसाठी इलेक्ट्रिक बसेस मिळाव्या अशी मागणी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांनी पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. यावेळी जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख, श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, राहुल कनाल, महेंद्र शेळके, जयंत जाधव, डॉ एकनाथ गोंदकर, सुरेश वाबळे, अनुराधा आदीक, अविनाश दंडवते, अॅड. सुहास आहेर, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. भाग्यश्री बानायत, उपकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, निलेश कोते,गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, आदी मान्यवरउपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत