राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील शिवबा प्रतिष्ठाणच्यावतीने शिवजयंती निमित्त शुक्रवार 18 फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिर संपन्न झाल...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील शिवबा प्रतिष्ठाणच्यावतीने शिवजयंती निमित्त शुक्रवार 18 फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिर संपन्न झाले.
शिवजयंतीनिमित्त शिवबा प्रतिष्ठाणच्यावतीने दरवर्षी विविध धार्मिक , सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविले जाते. शुक्रवारी मैड हॉस्पिटल राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने व डॉ.रवी घुगरकर यांचे मातोश्री हॉस्पिटल यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर संपन्न झाले.
या शिबिरात जवळपास ५८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
शिबिर यशस्वीतेसाठी शिवबा प्रतिष्ठानचे संस्थापक आदिनाथ कराळे, डॉ.रवी घुगरकर,राजू आंत्रे,अशर शेख, काजल ढिकले, मंजोत चहल,गिरीश जाधव, श्रुती खरात, प्रतीक्षा वाव्हळ, रेणुका चाबुकस्वार, मयुरी पाचारने, बापू भागवत आदींनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत