उंबरे : वेबटीम अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी उंबरे प्राथमिक शाळेच्या चिमुरड्या व...
उंबरे : वेबटीम
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी उंबरे प्राथमिक शाळेच्या चिमुरड्या विद्यार्थ्यानी डोक्यावर फगवा फेटा, हातात भगवा ध्वज, आणि मुखाने महाराजांचा जयघोष करत गावात प्रभात फेरी काढली. यावेळी वातावरण पूर्णतःभगवेमय झाल्याचे पहायला मिळाले.
उंबरे शाळेत आज सकाळी शाळेचे शिक्षक साठे सर, लोंढे सर, शिंदे सर, निकरड सर, गवळी मॅडम आदींनी शिवजयंती निमित्ताने अनेक कार्यक्रम सजवले होते. यामध्ये सकाळी शिस्तीत आणि कोरोना नियम पाळून प्रभात फेरी काढण्यात आली. या फेरीत मुलांनी केलेला जयघोष परिसर दुमदुमून टाकणारा ठरला. त्यानंतर शाळेत अनेक मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनानावर आधारित भाषणे केली. काही गीतामधून महाराजांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करण्यात आला.यामध्ये मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे काम शाळेच्या शिक्षकांनी केले. या उपक्रमामुळे शाळेच्या सर्व शिक्षकांचे गावातून कौतुक होताना दिसले. शाळेच्या मुख्याध्यापक गायकवाड यांचे मार्गदर्शन मिळाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत