छ शिवाजी महाराज यांनी जातीवर नव्हे तर मातीवर प्रेम केले :- अँड.नितीन पोळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

छ शिवाजी महाराज यांनी जातीवर नव्हे तर मातीवर प्रेम केले :- अँड.नितीन पोळ

कोपरगाव/वेबटीम:- महापुरुषांचे विचार आकाशाला गवसणी घालणारे असून दुर्दैवाने संकुचित विचारांच्या लोकानी महापुरुष जाती जातीत बंदिस्त केले मात्र ...

कोपरगाव/वेबटीम:-


महापुरुषांचे विचार आकाशाला गवसणी घालणारे असून दुर्दैवाने संकुचित विचारांच्या लोकानी महापुरुष जाती जातीत बंदिस्त केले मात्र या महापुरुषांनी  जातीवर नव्हे तर मातीवर प्रेम केले असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केले



कोपरगाव हमाल पंचायतीने छ शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छ शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.



या वेळी बोलताना पोळ पुढे म्हणाले की सद्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्या नावाखाली जाती धर्मात तेढ निर्माण करून वर्चस्व वाद सुरू आहे मात्र या करिता महापुरुषांच्या विचारांचा गैरवापर सुरू आहे मात्र महापुरुषांनी त्यांच्या विचारांनी आकाशाला गवसणी घातली असून या महापुरुषांच्या विचारणा जाती धर्मात संकुचित केले जात आहे मात्र या महापुरुषांनी जातीवर नाही तर देशाच्या मातीवर प्रेम केले आहे

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ म्हस्के यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब शेळके हे होते तर आभार दीपक ढोणे यांनी व्यक्त केले

तर कार्यक्रमास सुप्रसिद्ध व्यापारी मेजर कोल्हे बाळासाहेब पवार व हमाल पंचायत चे कर्मचारी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत