कोपरगाव/वेबटीम:- कोपरगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने आनंदाने १९ फेब्रुवारी रोजी साजरी झाली.शहरात या निमित्ताने ...
कोपरगाव/वेबटीम:-
कोपरगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने आनंदाने १९ फेब्रुवारी रोजी साजरी झाली.शहरात या निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न झाले या पार्श्वभूमीवर भूमीवर शहरातील सुदेश टाँकीज येथे पावनखिंड हा चित्रपट प्रदर्शित झाला.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत रविवार दि.२० रोजी शिवसेना उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे व कलविंदरसिंग दडियाल यांच्या मार्गदर्शनाखाली पावनखिंड या चित्रपटाच्या शोचे आयोजन सर्वसामान्य नागरिक व तरूणांसाठी केले होते.याप्रसंगी राजेंद्र झावरे म्हणाले की,पावनखिंड या चित्रपटाच्या माध्यमातून हा इतिहास सर्वसामान्य पर्यत पोहचला गेला आहे.मराठ्यांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आजच्या तरूणांना कळावे हि आमची प्रामाणिक इच्छा आहे.आजच्या तरूणांना इतिहास माहिती होणे गरजेचे आहे.पावनखिंड हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट असुन यामुळे सर्वसामान्य नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजेल त्यामुळे हा चित्रपट आवर्जून पाहावा असे आवाहन त्यांनी केले आहे.शहर प्रमुख कलविंदरसिंग दडियाल म्हणाले पावनखिंडीचा रणसंग्राम घडून ३६१ वर्षांचा काळ उलटला असला तरी हा अतुलनीय लढा आणि बाजीप्रभूंच्या अजोड स्वामीनिष्ठेची कथा मराठी जनमानसावर आजही अधिराज्य गाजवित आहे. बाजीप्रभूंच्या पराक्रमाचा अभूतपूर्व अध्याय उलगडून दाखविणाऱ्या दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘पावनखिंड’ हा चित्रपट आहे.पराक्रमाची आणि शौर्याची गाथा असलेला हा चित्रपट आहे.लाख मेले तरी चालेल परंतु लाखाचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे.असे बाजी प्रभु देशपांडे यांचा महान शौर्याचा इतिहास आहे.या वेळी उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे ,कोपरगाव शहर प्रमुख कलविंदरसिंग दडियाल,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विशाल झावरे,दिलीप आरगडे, दिलीप सोनवणे,इरफान शेख,बाळासाहेब सांळुके, राहुल देशपांडे, अश्यपभाई पटेल,अक्षिता आमले,अश्विनीताई होणे,सुनिल.कुढांरे,वैभव गिते, अशोक पवार मंगेश देशमुख प्रवीण शेलार उमेश छुगाणी, सतिष खर्डे,निलेश शिंदे,रवींद्र पवार,सतिष शिंगाणे, सचिन मोरे,सागर गायकर,सुहास शिंदे,वर्षा झावरे,शितल शर्मा, विक्रांत.खर्डे,स्नेहल कुडके,अक्षय वाकचौरे,शोभा चव्हाण आदि पदाधिकारी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत