निष्ठावान कार्यकर्त्यांना शहरप्रमुख दडियाल यांच्याकडून संधी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

निष्ठावान कार्यकर्त्यांना शहरप्रमुख दडियाल यांच्याकडून संधी

कोपरगाव / प्रतिनिधी:- केवळ बिनकामाचं प्रदर्शन करणाऱ्या तथाकथित पदाधिकाऱ्यांना डावलून प्रत्यक्षात जमिनीवर राहून काम करणाऱ्या निष्ठावान शिवसैन...

कोपरगाव / प्रतिनिधी:-


केवळ बिनकामाचं प्रदर्शन करणाऱ्या तथाकथित पदाधिकाऱ्यांना डावलून प्रत्यक्षात जमिनीवर राहून काम करणाऱ्या निष्ठावान शिवसैनिकांना न्याय दिल्याबद्दल शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांचे उत्तर नगर शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी अभिनंदन केले.



रविवारी (ता.१३) कोपरगाव शहर शिवसेनेची नूतन जम्बो कार्यकारिणीचा सत्कार करून नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी उत्तर नगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विशाल झावरे, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख नगरसेविका सपना मोरे, वर्षा शिंगाडे, महिला आघाडी शहरप्रमुख राखी विसपुते, उपशहरप्रमुख अश्विनी होने, युवती सेनेच्या जिल्हाअधिकारी अक्षिता आमले, शीतल चव्हाण, ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप अरगडे, दिलीप सोनवणे आदी उपस्थित होते.


यावेळी जिल्हाप्रमुख झावरे नव्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले आगामी काळात सर्वांनी एकजुटीने व एकनिष्ठेने काम करावे. शिवसेनेचे व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कार्य घराघरात पोहोचवावे. तसेच शिवसेनेचे कार्य ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण अशा पध्दतीनेच करावे असे आवाहन करुन निष्ठावान शिवसैनिकांना न्याय दिल्याबद्दल शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी शहरप्रमुख दडियाल, नगरसेविका मोरे, दिलीप सोनवणे यांची भाषणे झाली. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विशाल झावरे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. कोपरगाव शहर शिवसेनेचे प्रवक्ते राहुल देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार महिला आघाडीच्या शहरप्रमुख राखी विसपुते यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत