कोपरगाव( प्रतिनिधी) प्रत्येक क्षेत्रात नवनिर्मितीसाठी संशोधन अत्यंत महत्वाचे आहे. संशोधन हे विकासाचे द्योतक आहे, त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ...
कोपरगाव( प्रतिनिधी)
प्रत्येक क्षेत्रात नवनिर्मितीसाठी संशोधन अत्यंत महत्वाचे आहे. संशोधन हे विकासाचे द्योतक आहे, त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने पुढाकार घ्यावा असे आवाहन ॲड. संगीता आव्हाड यांनी केले.
ॲड. संगीता आव्हाड यांना नुकतीच नांदेड येथील स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. कोपरगावचे भूमीपुत्र तथा न्यायाधीश विक्रम आव्हाड यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत. ॲड. संगीता आव्हाड यांनी सन २०१० मध्ये विधी विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून एल. एल. एम. केले. त्यानंतर सन २०१२ मध्ये त्यांनी नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन सन २०१४ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे डॉ. वीणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 'अहमदनगर जिल्ह्यातील ग्राहक संरक्षण जागृकता : सामाजिक-कायदेशीर अभ्यास' या विषयावर संशोधन करून त्यावर प्रबंध सादर केला.
सदर प्रबंधास विद्यापीठाने मान्यता देऊन त्यांना पीएच.डी. प्रदान केली. सदर संशोधनातून अहमदनगर जिल्ह्यात ग्राहक संरक्षण जागरूकता किती आहे व ती वाढविण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या जाऊ शकता याचा विस्तृत अभ्यास करून प्रबंध लिहिण्यात आला.
याच धर्तीवर प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र अभ्यास करून ग्रामीण व शहरी भागात ग्राहक संरक्षणाची जागरूकता निर्माण करता येऊ शकते असे मत सहा. प्राध्यापक डॉ. वीणा पाटील यांनी मांडले. या संशोधन कार्यात ॲड. संगीता आव्हाड यांना आनंद घोडेराव, प्रिया अभंग, सासरे अंबादास आव्हाड, सासू मीनाक्षी आव्हाड, समस्त आव्हाड कुटूंबीय यांनी सहकार्य केले. याचबरोबर न्यू यंग स्टार्स क्लब कोपरगावच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा कोपरगाव नगरपालिकेचे स्वच्छता व पर्यावरण दूत आदिनाथ ढाकणे यांनीही त्यांचे अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत