चळवळीतील कार्यकर्त्याला बळ म्हणजेच चळवळी ला बळ :-अँड.नितीन पोळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चळवळीतील कार्यकर्त्याला बळ म्हणजेच चळवळी ला बळ :-अँड.नितीन पोळ

कोपरगाव/वेबटीम:- सामाजिक कार्यकर्ता  म्हणून जगत असताना प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्याला बळ देणे म्हणजेच चळवळीला बळ दे...

कोपरगाव/वेबटीम:-


सामाजिक कार्यकर्ता  म्हणून जगत असताना प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्याला बळ देणे म्हणजेच चळवळीला बळ देणे आहे असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केले



क्रांतिवीर लहुजी टायगर सेनेचे अध्यक्ष शरद त्रिभुवन यांच्या वाढदिवसा निमित्ताने लोक स्वराज्य आंदोलन व समविचारी संघटनांच्या वतीने शरद त्रिभुवन यांच्या वाढ दिवसा निमित्ताने "गौरव संघर्षशील नेतृत्वाचा" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र शासनाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार प्राप्त जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिपकराव गायकवाड यांच्या हस्ते शरद त्रिभुवन यांचा सत्कार करण्यात आला तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णा भाऊ साठे दलित मित्र पुरस्कार प्राप्त सामाजिक  राजेंद्र बागुल हे होते

या वेळी बोलताना पोळ पुढे म्हणाले की चळवळीत काम करणारा कार्यकर्ता दिवस रात्र समाजाच्या विविध प्रश्नांवर काम करत असतो व समाजाच्या विविध प्रश्नांवर काम करतो मात्र अशा कार्यकर्त्याला बळ देणे म्हणजे चळवळी ला बळ देणे आहे 

या वेळी दिपक गायकवाड,राजेंद्र बागुल, निसार शेख माजी नगरसेवक जयवंत मरसाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमास संजय तूपसुंदर, देवराम पगारे,शंकर बिऱ्हाडे,       अनिल पगारे, रोहिदास पाखरे, सोमनाथ म्हस्के, मोहन त्रिभुवन , फकीर महम्मद पहिलवान आदी मान्यवर उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत