कोपरगाव /वेबटीम:- येथील काँग्रेसचे युवा शिलेदार, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक तुषार पोटे यां...
कोपरगाव /वेबटीम:-
अमृतसर येथील स्थानिक उमेदवार सुनील दत्ती यांच्या निवडणूक प्राचारार्थ तुषार पोटे सध्या अमृतसर येथे नुकतेच दाखल झाले असून घर-घर प्रचार, समाज माध्यमांद्वारे प्रबोधन व रवीदासी समाजातील युवकांच्या गाठीभेटी घेऊन काँग्रेसचा प्रचार करणार आहेत. पोटे यांना संघटनात्मक कामाकाजासह निवडणूक यंत्रणा, सोशल मीडियावरील अभियान यांचा दांडगा अनुभव आहे. याचीच दखल घेत युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास, एससी. विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व अमृतसर जिल्हा प्रभारी राजेश लिलोठीया, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पोटे यांची निवडणूक कामकाजासाठी नियुक्ती केली आहे. या निवडीबद्दल कोपरगाव तालुका काँग्रेस, संगमनेर तालुका काँग्रेससह जिल्ह्यातील काँग्रेस नेते त कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत