कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव तालुक्यात सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले सेवा फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव तालुक्यात सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले सेवा फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने सलग तिसऱ्या वर्षी भव्य रक्तदान शिबिर दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी संत ज्ञानेश्वर व्यापारी संकुल, छत्रपती शिवाजी महाराज स्मारका जवळ सकाळी 10 वा.आयोजित करण्यात आले होते.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन कोपरगाव शहर पालिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या हस्ते करण्यात आले ,या प्रसंगी एकून 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याची माहिती सेवा फाउंडेशन के अध्यक्ष जुनेद शेख यांनी दिली.
रक्ताचा तुटवडा भासू नये आणि गरजेच्या वेळेस मागेल त्याला रक्त उपलब्ध व्हावे याकरीता या शिबिराचे आयोजन करण्यात असल्याचे सेवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यां कडून सांगण्यात आले , कोरोनाच्या काळात निर्माण होणारा रक्ताचा तुटवडा पाहता रक्तदानाचा उपक्रम महत्त्वाचा ठरतो . वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्याने अनेक जणांना प्राण गमवावे लागतात . त्यामुळे रक्तदान ही काळाची गरज आहे .
रक्तदानाच्या या उपक्रमाला तालुक्याचे ना .आशुतोष काळे, युवानेते विवेक कोल्हे , शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातवसह अनेक मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
या वेळी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष जुनेद शेख़, उपाध्यक्ष पत्रकार हफीज़ शेख, इरफान तंबोळी, मतीन चोपदार,आसिफ मनियार, नवाज कुरैशी, यूसुफ पठाण, फिरोज पठाण, फिरोज शेख, रिजवान शेख, तसेच सर्व पदाधिकारी उपस्तिथ होते....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत