कोपरगाव कोपरगाव शहरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे व कलविंदर सिंग य...
कोपरगाव
कोपरगाव शहरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे व कलविंदर सिंग यांच्या मागदर्शनाखाली युवती सेनेच्या वतिने मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आहे.
दि १९ फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. महिला स्त्रीशक्ती जनजागृती रॅली आयोजीत करून अनोख्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आहे. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणापासुन स्त्री शक्ती जनजागृती रँलीची सुरुवात करण्यात आली
राष्ट्रमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श राजा घडवून रयतेचे राज्य निर्माण केले.शिवाजी महाराजांच्या आदर्श प्रत्येकाने घेवुन छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचारणात आणावे. असा संदेश या रँलीच्या निमित्ताने देऊन शुभेच्छा दिल्या आहे.या कार्यक्रमासाठी जिल्हाप्रमुख अक्षिता आमले ,अमृता राऊत,शितल चव्हाण, सुकन्या आमले अदिति बरावकर स्नेहल कुडके,अनिता वायखिंडे,पूजा शर्मा ,तनवी क़ुवर , हर्षा पाटिल आदी युवती महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत