कोपरगाव / प्रतिनिधी:- कोपरगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने भूमिपुत्र व लब्बैक सोश...
कोपरगाव / प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने भूमिपुत्र व लब्बैक सोशल फाउंडेशन कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यामाने 'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी वृक्ष वाटप केले.
संपूर्ण जग कोरोना महामारीने ग्रासले असताना कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची खरी गरज भासली. मात्र, मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला.या तुटवड्यावर मात करता यावी यासाठी नैसर्गिक ऑक्सिजनची निर्मिती व्हावी व पर्यावरणातील समतोल राखता यावा या अनुषंगाने भूमिपुत्र व लब्बैक सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सुमारे ५०० वृक्ष वाटपाचा करण्यात आले. यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, उपनिरीक्षक भरत दाते, नामदार आशुतोष काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, युवानेते विवेक कोल्हे, भाजप पदाधिकारी, श्री.संधान, केशव भवर, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, विजय आढाव, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र झावरे, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, शिवसेना शहरप्रमुख कलविंदर दडीयाल, सनी वाघ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, भाजप शहराध्यक्ष डी. आर. काले, दीपक वाजे, काँग्रेसचे अब्बास सय्यद, वंचितचे जिल्हाध्यक्ष शरद खरात, ऍड. नितीन पोळ, नानासाहेब जगताप, सेक्युरिटी ऑफिसर अकबर शेख, सलीम पठाण, विजय त्रिभुवन, कोपरे साहेब, राजू उशीरे, नितीन शिंदे, शिवसेना पदाधिकारी शीतल चव्हाण, युवकाध्यक्ष नवाज कुरेशी, युवा मोर्चाचे अविनाश पाठक, गणपत पवार, रियाज सर, मनोज शिंदे, संजय कांबळे, शंकर घोडेराव, इम्तियाज अत्तार, जावेद शेख, शपिक शेख, अय्युब कच्छी, शरद त्रिभुवन, अल्ताफ कुरेशी, खालिक कुरेशी फक़ीरमहमद पहलवान आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निसार शेख, लब्बैक सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अकबर शेख, अंसार शेख, अकिशबागवान, प्रा.इमरान सय्यद, वसीम चोपदार, जाकिर शेख, समीर शेख, आसिफ पठाण, माजिद पठाण, अरशद पठाण, इमरान शेख, ओवैश मौलाना, सुनील बोराडे यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत