पानेगांवकरांनी तालुक्याबरोबरचं जिल्ह्याच्या वैभवात भर घातली- नामदार गडाख - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पानेगांवकरांनी तालुक्याबरोबरचं जिल्ह्याच्या वैभवात भर घातली- नामदार गडाख

पानेगांव वार्ताहर-  नेवासे तालुक्यातील पानेगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने शिवप्रतिमेचे पुजन व शिवस्मारक सुशोभिकरण पाहण...

पानेगांव वार्ताहर- 


नेवासे तालुक्यातील पानेगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने शिवप्रतिमेचे पुजन व शिवस्मारक सुशोभिकरण पाहणी करते वेळी महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख पाटील महादेव देवस्थान सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलतं होते.



अध्यक्षस्थानी नेवासे पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे हे होते.

नामदार गडाख यांनी आपल्या भाषणात सांगितले की,गावा गावात तालुक्यात जिल्ह्यात राज्य भरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. पानेगांवामध्ये नेहमीच मोठ मोठे कार्यक्रम होत असतात पण  आज  ज्यावेळी मी आलो  येथील शिवभक्तांचा उत्साह पाहून मी भारावून गेलो.आजचा कार्यक्रम ज्या पद्धतीने एकोप्याने व मोठ्या उत्साहात केला त्याच पद्धतीने गावातील परीसरातील प्रश्नांनवर तसेच विकासाच्या मुद्यावर एकत्र आलं पाहिजे.असा मौलीक सल्ला या वेळी नामदार गडाख यांनी दिला. मोठ्या प्रमाणावर विकासाचे काम परीसरात होत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त करुन सदैव आपल्या पाठीशी उभा राहणार असून मला मत्रीपदापर्यंत पोहचविण्याचे काम तुम्ही केलं असाच आशिर्वाद मला येथून पुढच्या काळात राहुद्या.गडाख यांनी म्हटले.

अहमदनगर जिल्हा परिषद सभापती सुनिल गडाख यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा देवून,पानेगांव हे अतिशय धार्मिक गांव असून येथील ग्रामस्थ चांगल्या कामासाठी एकत्र येत असतात. खरवंडी गटात मोठ्या प्रमाणावर विकास कामांसाठी विक्रमी निधी दिला असून पानेगांवत मोठ्या प्रमाणावर निधी दिला असून आणखी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले.

प्रस्ताविक लोकनियुक्त सरपंच संजय जंगले यांनी नामदार शंकरराव गडाख पाटील तसेच सभापती सुनिल गडाख यांनी दिलेल्या निधी मुळे कामाचं कौतुक होत असून त्यांचे आम्ही त्रणी असल्याचे म्हटलं

कार्यक्रमासाठी शिवसेना श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष अॅड सुभाष जंगले, हभप उध्दव महाराज मंडलिक,हभप शिवाजी महाराज देशमुख, शास्त्री जंगले महाराज, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कोलते, मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर उपाध्यक्ष कडूबाळ कर्डीले, अच्युतराव घावटे, अण्णासाहेब कंक, लक्ष्मणराव जाधव, पांडुरंग माकोणे,बेल्हेकरवाडीचे सरपंच दत्तात्रय बेल्हेकर,रासपचे जिल्हाप्रमुख नानासाहेब जुंधारे, योगेश म्हस्के,भरत बेल्हेकर, संभाजी दौंड, रमेश गुडधे, भाऊसाहेब गायके,पानेगांवचे उपसरपंच रामराजे जंगले, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय घोलप,मुळाचे संचालक रंगनाथ जंगले,पानेगांव संस्थेचे अध्यक्ष जालिंदर जंगले, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष किशोर जंगले, राजेंद्र जंगले, साहेबराव जंगले, दिपक जंगले ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे, सतिश फुलसौंदर, वंचित जिल्हा उपाध्यक्ष विजय गायकवाड, सुनिल चिंधे, दिनेश जंगले, अभिषेक जंगले, बबनराव जंगले, विशाल जंगले, संकेत गुडधे संतोष पवार सेनेचे बाळासाहेब पवार, डॉ विटनोर, गोटीराम विटनोर,ठकाजी बाचकर, चंद्रकांत टेमक, शिवसेना महिला आघाडीच्या दिपाली नवगिरे,गितांजली जंगले,माधुरी जंगले,स्वाती पाटील, सुनिता जंगले,सौ.जंगले आदींसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.

सुत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे आभार श्रीकांत जंगले यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत