आरपीआय राहुरी तालुका अध्यक्ष विलास नाना साळवे यांचा वाढदिवस साजरा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आरपीआय राहुरी तालुका अध्यक्ष विलास नाना साळवे यांचा वाढदिवस साजरा

राहुरी/वेबटीम:- आरपीआयचे राहुरी तालुकाध्यक्ष व भिमतेज मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष  विलास साळवे यांचा अभिष्टचिंतन सोहळा शुक्रवारी राहुरी श...

राहुरी/वेबटीम:-


आरपीआयचे राहुरी तालुकाध्यक्ष व भिमतेज मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष  विलास साळवे यांचा अभिष्टचिंतन सोहळा शुक्रवारी राहुरी शहरातील राजवाडा येथे पार पडला.


 सर्वसामान्यांच्या  अडचणीच्या काळात नेहमी मदतीला धावणारे सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे व युवकांचे प्रेरणास्थान असलेले आरपीआय तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे  होते.


यावेळी चैतन्य उद्योग समूहाचे गणेश भांड, आरपीआयचे जेष्ठ नेते विजय वाकचौरे, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र  थोरात , माजी नगराध्यक्षा ज्योती त्रिभुवन, रिपब्लिकन सेनेचे राजेंद्र आढाव, आरपीआय युवा जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, आरपीआय महिला जिल्हा अध्यक्ष सुनीता बोरुडे, महिला तालुकाध्यक्ष स्नेहल सांगळे , जिल्हा उपाध्यक्ष  बाळासाहेब जाधव, गणपत गव्हाणे, कुमार भिंगारे ,आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, अरुण साळवे, शांती चौक मित्र मंडळाचे दीपक त्रिभुवन,  सौ दुशिंग आदी मान्यवर उपस्थित होते. तहसीलदार एफ.आर.शेख यांनी विलास साळवे यांना शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी आरपीआय तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे, संतोष दाभाडे, मयूर सूर्यवंशी, अतुल त्रिभुवन,  राजेंद्र बागुल, अतुल त्रिभुवन, पिंटू अल्लाट, नंदू सांगळे, सचिन साळवे, बाळासाहेब पडागळे , किरण पंडित, निलेश त्रिभुवन, दिलीप माने, नेल्सन कदम , भाऊ औटी,  दीपक सांगळे , सुरज खरात आदिंसह विविध पक्ष व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबन साळवे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत