राहुरी/वेबटीम:- राहूरी फॅक्टरी येथे आज 19 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेत शिक्षण वृंद व मुस्लिम समाजाच्या वतीने शिवजयंती...
राहुरी/वेबटीम:-
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध उपक्रम घेण्यात आले दरम्यान सर्व कार्यक्रम मुलांनी उत्साहात पार पाडले .
यानिमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ व शिवराय यांच्या बद्दल सखोल माहिती मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचार, स्वराज्याची माहिती सर्व काही मुलांना माहीत झाले.शाळेतील सर्व विद्यार्थी त्यांचे पालक व जामा मस्जिद राहुरी फॅक्टरीचे मौलाना बशीर पठाण, देवळाली प्रवरा नगरपालिका नगरसेविका सुजाता कदम अनिल येवले सर, प्रा. सुधाकर कदम, राजेंद्र लोखंडे, रफिक सय्यद, शाहिद सय्यद, टिपू शेख, उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवचरित्रकार हसनभाई सय्यद उपस्थित होते.
शिवचरित्रकार हसन सय्यद मनोगत व्यक्त करताना म्हणाले, की शिवराय सर्व समाजातील बांधवांना आदर्श आहेत व ते भारतातील प्रत्येक घराघरात छत्रपती शिवराय पोहोचविणे आज काळाची महत्वपूर्ण गरज आहे, शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सरदार व शिपाई सारखे इतरही धर्मातील बहुजन शिपाई व सरदार आहेत परंतू ते इतिहासात दडून आहेत त्याचा ही इतिहास आज समाजापुढे येणे गरजेचे आहे जेणे करून असंख्य जाती धर्मातील समाज बांधव एकत्र व उत्साहपूर्ण शिवजयंती साजरी करून एकता, समता व बंधुता समाजात नांदावी व त्यासाठी प्रबोधनाच्या माध्यामातून सदैव प्रयत्न करत राहील त्यांनी मोलाचे मार्गदर्शन करून भविष्यात शाळेला प्रबोधनाच्या माध्यमातून कोणतीही गरज भासल्यास आपण सदैव तत्पर राहू.
शाळेतून प्रभातफेरी काढून राहुरी कारखाना येथील शिवाजी महाराजांची प्रतिमेला पुष्पहार करण्यात आले मुलांनी भाषणे केली विविध पोवाडे गायले व घोषणांचा एकच गजर केला "जय भवानी, जय शिवाजी"
समाजामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्याचा कार्य उर्दू शाळेने व मुस्लिम बांधवाने केला असे लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त करून कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका शाह सईदा अल्ताफ मॅडम, मदिना मॅडम, मुख्याध्यापक सय्यद तौसिफ सर व मौलाना बशीर पठाण यांनी विशेष प्रयत्न केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत