रेन्बो इंटरनॅशनल स्कूल मध्ये 'शिवजन्मोत्सव सोहळा ' धुमधडाक्यात साजरा - - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

रेन्बो इंटरनॅशनल स्कूल मध्ये 'शिवजन्मोत्सव सोहळा ' धुमधडाक्यात साजरा -

कोपरगाव/वेबटीम:- शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे स्थापित रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा जल्लोषात व धुमधडाक्यात साजरा करण्यात आला...

कोपरगाव/वेबटीम:-


शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे स्थापित रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा जल्लोषात व धुमधडाक्यात साजरा करण्यात आला . छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमले होते . विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व चैतन्य संचारले होते व देशभक्तीची भावना उफाळून आली होती . सदर शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिव व्याख्याते श्री . दिपक रामराव देशमुख सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यासह विश्वभारती रूरल एज्युकेशन संस्थेचे सचिव - मा. श्री . संजयजी नागरे सर, प्रशासक - श्री . सुरेशजी शिंदे सर, उपप्राचार्य - प्रशांत भास्कर सर यांसह सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी  उपस्थित होते .कार्यक्रमातंर्गत झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याने उपस्थितांचे नेत्र दिपले . तर कु .अक्षिता बडजाते , चि . श्लोक उगले, चि . देवराज देशमुख या विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली . चि . नैतिक निकुंभ  या विद्यार्थ्यांने 'अफजलखान  वधाचे' वर्णन आपल्या पोवाड्यातून केले . तर कु .ईश्वरी ढमाले या विद्यार्थीनीने छ .शिवाजी महाराजांची भूमिका साकारत दिशाहिन  झालेल्या मावळ्यांना  अर्थात तरुणांना विधायक कार्यासाठी प्रवृत्त करणारा संदेश दिला . प्रमुख पाहुणे शिव व्याख्याते श्री . दिपक देशमुख सरांनी इतिहासातील प्रसंग हुबेहुब मांडत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चारित्र्य आणि चरित्र याचा अभ्यास करावा व मुलांनी प्रत्येक मुलीत आपली बहिण बघावी असा मौलिक विचार आपल्या व्याख्यानातून मांडला . सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती ढमाले सह नंदिनी वक्ते मॅडम यांनी केले . तर संस्थेचे अध्यक्ष श्री. कांतीलालजी अग्रवाल सर, सचिव श्री.संजयजी नागरे सर, विश्वस्त श्री. मनोजशेठ अग्रवाल सर, विश्वस्त श्री. आनंदजी दगडे सर , कार्यकारी संचालक आकाशजी नागरे सर, प्रशासक - सुरेश शिंदे सर ,उपप्राचार्य - प्रविण कदम सर, सोमनाथ सोनवणे सर ,प्रशांत भास्कर सर यांनी 

शिवजन्मोत्सव सोहळा साजरीकरणाचे  कौतुक करत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत