राहूरी फॅक्टरी येथील चोथे वस्ती येथील साई पारायण सोहळ्याची उद्धव महाराज मंडलिक यांच्या कालाच्या किर्तनाने सांगता - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरी फॅक्टरी येथील चोथे वस्ती येथील साई पारायण सोहळ्याची उद्धव महाराज मंडलिक यांच्या कालाच्या किर्तनाने सांगता

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील जुन्या देवळाली प्रवरा ते राहुरी फॅक्टरी रोडवरील चोथे वस्ती पेपर मिल रोड येथील साई पारायण सोहळ्य...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-



राहुरी तालुक्यातील जुन्या देवळाली प्रवरा ते राहुरी फॅक्टरी रोडवरील चोथे वस्ती पेपर मिल रोड येथील साई पारायण सोहळ्याची ह.भ.प उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने शनिवारी  सांगता झाली.



  चोथे वस्ती येथील  परिसरातील नागरिकांच्यावतीने गेल्या सात दिवसांपासून  साई चरित्र पारायण सोहळा सुरू होता. या पारायण सोहळ्यात मोठ्या प्रमाणात भाविकांनी सहभाग नोंदविला. प्रवचन, भजन, हरिपाठ आदी धार्मिक पार पडले 



    दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता ग्रंथ अवतरणिका तसेच छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन  पार पडले. त्यानंतर महंत उद्धव महाराज मंडलिक(नेवासेकर) काल्याचे जाहीर हरिकीर्तन व महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रसंगी उद्धव महाराज मंडलिक यांनी आपल्या कीर्तनातून छत्रपती शिवरायांचे विचार व आचार अंगिकारून वाटचाल करावी असे आवाहन केले. तर माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी यावेळी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.


यावेळी माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी आ.चंद्रशेखर कदम,  साई संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे, ज्येष्ठ नेते सीताराम ढुस,  पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, तनपुरे कारखान्याचे संचालक अशोक खुरुद, मच्छीन्द्र तांबे, सुरसींगराव पवार, माजी नगराध्यक्ष गोरख मुसमाडे, शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, जोगेश्वरी सोसायटीचे चेअरमन मारुतराव हारदे, संचालक ज्ञानदेव हारदे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश वाळुंज तसेच देवळाली प्रवरा नगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक व आदर्श नागरी पतसंस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते. यावेळी आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन आण्णासाहेब चोथे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सन्मान केला.



सप्ताह यशस्वीतेसाठी व्यासपीठ चालक साई भक्त श्रीनिवास सहदेव,  ह.भ.प बाबा महाराज मोरे, आण्णासाहेब चोथे मित्र मंडळ,   गणपती चौक भजनी मंडळ, शांती चौक मित्र मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, तुळजा भवानी मित्र मंडळ तसेच परिसरातील दानशूर अन्नदाते, गायनाचार्य, मृदुंग वादक, टाळकरी, विणेकरी, साईभक्त तसेच चोथे वस्ती परिसरातील नागरिकांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत