बेलापूर-आंबी-कोल्हार रस्ता गेला खड्ड्यात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

बेलापूर-आंबी-कोल्हार रस्ता गेला खड्ड्यात

आंबी/वेबटीम:- अमृतवाहिनी प्रवरा नदी काठावरील बेलापूर खुर्द, केसापूर, आंबी, अंमळनेर, दवणगाव, संक्रापुर, गंगापूर, कोल्हार खुर्द या रस्त्याची अ...

आंबी/वेबटीम:-



अमृतवाहिनी प्रवरा नदी काठावरील बेलापूर खुर्द, केसापूर, आंबी, अंमळनेर, दवणगाव, संक्रापुर, गंगापूर, कोल्हार खुर्द या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे समजेनासे झाले आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून लवकरात लवकर सदर रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

    बेलापूर, श्रीरामपूर, कोल्हार या शहरांच्या बाजारपेठांशी जोडणारा हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. रस्त्यावरील साईटपट्ट्याही मोठ्या प्रमाणात खचल्या असून कपारी उघड्या पडल्याने खड्डे वाहतुकीला 'ब्रेक' लावत आहेत. तसेस रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडे-झुडपे वाढल्याने रस्ता अरुंद झाला आहे. श्रीरामपूर मतदारसंघाचे आ. लहू कानडे यांनी या रस्त्यासाठी पाच कोटी रुपये निधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून मंजूर करून आणला आहे. मात्र प्रत्यक्षात काम कधी सुरू होणार याकडे प्रवाशांच्या नजरा लागल्या आहेत. शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी, दिव्यांग, रुग्ण तसेच जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले हरिहर केशव केशव गोविंद बन देवस्थान याच रस्त्यावर असल्याने भाविकांचे प्रचंड हाल होत आहेत.


"बेलापूर-आंबी-कोल्हार-कोल्हार रस्त्याची अवजड वाहतुकीमुळे मोठी दुरवस्था झाली आहे. वाहतुकीच्या मानाने रस्ता अरुंद झाला आहे. त्यात काटेरी झाडे व अतिक्रमनांनी रस्ता गिळंकृत केला असतानाच सार्वजनिक बांधकाम खाते डोळे मिटून गप्प आहे. लवकरात लवकर सां.बा.ने या रस्त्याचा स्वास मोकळा करून रस्ता खड्डेमुक्त न केल्यास धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन झेडले जाईल."

- जालिंदर रोडे (राहुरी तालुकाध्यक्ष - धनगर समाज संघर्ष समिती)



"महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी श्रीरामपूर येथे जावे लागते. मात्र खराब व खड्डेयुक्त रस्त्यामुळे वेळेवर पोहोचता येते नाही. त्यामुळे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे. रस्त्याची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांचेहोणारे नुकसान टाळावे."

- अक्षय पवार (महाविद्यालयीन विद्यार्थी)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत