कोपरगाव/वेबटीम:- शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे स्थापित रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक विविध उपक्रम ...
कोपरगाव/वेबटीम:-
शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे स्थापित रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक विविध उपक्रम राबविले जातात त्याचेच प्रतिफल म्हणजे शाळेचा माजी विद्यार्थी चि . तन्मय धीरज बजाज याने मिळवलेले नेत्रदीपक यश . बालपणापासुन तन्मयने डॉक्टर होण्याची इच्छा उरी बाळगुन वाटचाल सुरु ठेवली . जिद्द , आत्मविश्वास, गुरुजनांचे मार्गदर्शन व पालकांचा पाठिंबा यामुळे चि.तन्मय यास
गुणवत्तेच्या आधारावर शासनमान्य महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालय वर्धा येथे प्रवेश मिळाला असुन त्याची स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे .
त्या अनुषंगाने शाळेच्या वतीने तन्मय व त्याचे पालक यांचा गौरव करण्यात आला . शाळेकडून केल्या गेलेल्या या गौरव सोहळ्याने पालकांसह तन्मय भारावून गेला . माझ्या यशाचे श्रेय माझ्या आईवडिलांसह माझ्या शालेय शिक्षकांना जाते असे विचार आपल्या भाषणातून तन्मयने मांडले या गौरव सोहळ्यासाठी विश्वभारती रुरल एज्युकेशन संस्थेचे सचिव मा . श्री संजयजी नागरे सर , श्री . धीरजजी बजाज सर, सीमाताई बजाज मॅडम , प्रशासक सुरेशजी शिंदे सर , उपप्राचार्य- सोमनाथ सोनवणे सर, प्रशांत भास्कर सर, प्रविण कदम सर सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते . सदर प्रसंगी बोलताना संजयजी नागरे सर यांना अण्णांच्या आठवणीने भरून आले आपल्या शाळेतील विद्यार्थी सर्व क्षेत्रांत उच्च पदावर पोहचावेत व त्यांच्या हातून देशसेवा घडावी हा अण्णांचा विचार आपल्या मनोगतातून भाऊंनी मांडला तर या क्षणाच्या प्रतिक्षेत तन्मयने सातवर्षे खडतर कष्ट केल्याचे आई सीमाताई बजाज यांनी सांगितले . तन्मयचे हे यश नक्कीच सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक व प्रेरक ठरेल असे सांगत सोमनाथ सोनवणे सरांनी तन्मयला शुभेच्छा दिल्या . सदर कार्यक्रमात शुभेच्छारूपी व प्रेरणादायी शब्दसुमनांचा वर्षाव करत नेहा पहाडे मॅडम व नंदिनी वक्ते मॅडम यांनी सुत्रसंचालन केले तर संस्थचे अध्यक्ष श्री. कांतीलालजी अग्रवाल, विश्वस्त श्री. मनोजशेठ अग्रवाल, विश्वस्त श्री. आनंदजी दगडे , कार्यकारी संचालक आकाशजी नागरे यांनी ही तन्मयच्या उत्तुंग यशाचे कौतुक करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत