आ.सुधीर तांबे यांची देवळाली व राहुरी फॅक्टरीत भेट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आ.सुधीर तांबे यांची देवळाली व राहुरी फॅक्टरीत भेट

  देवळाली प्रवरा(वेबटीम):- नाशिक पदवीधर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आ.डॉ.सुधीर तांबे यांनी देवळाली प्रवरा व राहुरी येथे भेट दिली. यावे...

 देवळाली प्रवरा(वेबटीम):-


नाशिक पदवीधर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आ.डॉ.सुधीर तांबे यांनी देवळाली प्रवरा व राहुरी येथे भेट दिली. यावेळी अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे नवनियुक्त सचिव अजय खिलारी यांचा आ.तांबे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.



आ. डॉ सुधीर तांबे हे राहुरी तालुका दौऱ्यावर आले असता देवळाली प्रवरा येथे अजय खिलारी यांच्याकडे सदिच्छा भेट दिली. जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव पदी खिलारी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कॉंग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी व सभासद नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन व सूचना आ.तांबे यांनी केल्या.सर्वप्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले.



यावेळी युवक कॉंग्रेस समन्वयक राजेंद्र बोरुडे, बाळासाहेब विठ्ठल आढाव, दीपक पठारे, युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष कुणाल पाटील,विवेक मुसमाडे, सतीष म्हस्के, बाळासाहेब पठारे, विलास संसारे, अविनाश जाधव,भारत निर्मल,प्रदीप पंडित, अशोक कदम,योगेश कोतकर,आनंद राऊत, विशाल महांकाळ आदि उपस्थित होते.


तत्पूर्वी  आ डॉ सुधीर तांबे यांनी नूतन माध्यमिक विद्यालय राहुरी फँक्टरी, राजश्री शाहू महाविद्यालय देवळाली प्रवरा, श्री छत्रपती माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय देवळाली प्रवरा, लोकनेते रामदास धुमाळ कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी येथे  शिक्षकांच्या भेटी घेऊन समस्या जाणून घेतल्या.



तसेच राहुरी फँक्टरी येथेही भेट दिली. यावेळी आमदार सुधीर तांबे यांचा सन्मान केला. प्रसंगी तैनुरभाई पठाण, अतुल कराड, अभिजित आहेर, उत्तम साळवे, बाळासाहेब गिरी, सचिन लोखंडे,तुषार राऊत आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत