कोपरगाव शिवसेनेच्या पत्राची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून दखल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव शिवसेनेच्या पत्राची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून दखल

कोपरगाव / प्रतिनिधी:- २५ जानेवारी २०२२ रोजी प्रधानमंत्री आवास योजनेत ऑटो डिलिट झालेल्या व समितीने जाचक अटींच्या आधारे अपात्र ठरवलेल्या लाभार...

कोपरगाव / प्रतिनिधी:-


२५ जानेवारी २०२२ रोजी प्रधानमंत्री आवास योजनेत ऑटो डिलिट झालेल्या व समितीने जाचक अटींच्या आधारे अपात्र ठरवलेल्या लाभार्थींचा पात्र यादीत समावेश करावा. यासाठी कोपरगाव शिवसेनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला होता;याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री कार्यालयामार्फत    संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याची प्रधानमंत्री आवास योजनेतील ऑटो डिलिट झालेल्या व समितीने अपात्र ठरविलेल्या लाभार्थींच्या बाबतीत उचित कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना मुख्यमंत्री कार्यालयाने   ग्रामविकास मंत्रालयास   दिल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांनी दिली.


शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नुकतीच गटविकास अधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. याबाबाबत बोलताना गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी ऑटो डिलिटच्या लाभार्थ्यांची फेरसर्व्हेच्या दृष्टीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांसह इतर अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरसिंग बैठक पार पडली असून लवकरच शासन निर्णय होईल असा आशावाद व्यक्त केला आहे. जे लाभार्थी पात्र यादीत आले परंतु समितीने रिजेक्ट केले त्यांचा सर्व्हे परत करण्यात येईल व त्या लाभार्थ्यावर अन्याय होणार नाही त्याकरिता स्वतः गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १८ जणांची तालुका समिती पुन्हा सर्व्हे करणार आहे, अशी शिवसेनेच्या आंदोलनकर्त्यांना गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांनी माहिती दिली.


तसेच घरकुल योजनेतील जाचक  अटी दुरुस्त करण्याची या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, विधानसभा कार्याध्यक्ष रावसाहेब थोरात, माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक कानडे, माजी तालुकाप्रमुख श्रीरंग चांदगुडे,

शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख किरण खर्डे, तिरोडा संपर्कप्रमुख प्रवीण शिंदे, उपतालुकाप्रमुख सर्व सागर फडे, रंगनाथ गव्हाणे, बाळासाहेब मापारी, बाळासाहेब राऊत, राजेंद्र नाजगड, संजय दंडवते, राहुल होन, सचिन असणे, नानाभाऊ डोंगरे, दीपक चौधरी, गणेश बरवंट, धर्मा जावळे, पंकज शिंदे, अशोक मुरडनर, विजय ताजणे, नंदू निकम, विठ्ठल निकम आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत