राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर येथे श्री क्षेत्र गहिनीनाथ गड(बीड)येथील संत श्री वामनभाऊ महाराज यांची 46 वी पुण्यतिथी ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर येथे श्री क्षेत्र गहिनीनाथ गड(बीड)येथील संत श्री वामनभाऊ महाराज यांची 46 वी पुण्यतिथी सोहळा दिनांक 9 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली.
प्रसंगी श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथील मठाधिपती महंत ह भ प विठ्ठल महाराज यांचे कीर्तन झाले. यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.सदर कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी केले जाते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मारुती मोरे, ज्ञानेश्वर मोरे,श्री. बारगजे मुकादम(बारगजे वाडी),श्री आघाव सर तसेच पंचक्रोशीतील अनेक दाते यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत