माहेश्वरी महिला मंडळातर्फे पुंडे, कुलकर्णी यांचा सत्कार. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

माहेश्वरी महिला मंडळातर्फे पुंडे, कुलकर्णी यांचा सत्कार.

कोपरगाव/वेबटीम:-   गेल्या बावीस वर्षांपासून महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग शिक्षिका सौ. विमलताई पुंडे या परिश्रम घेत आहेत.  योग...

कोपरगाव/वेबटीम:-


 गेल्या बावीस वर्षांपासून महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग शिक्षिका सौ. विमलताई पुंडे या परिश्रम घेत आहेत.  योग वर्गाच्या माध्यमातून योगासने व प्राणायामाचे त्या निरपेक्ष वृत्तीने काम करीत आहेत. तसेच गायन क्षेत्रात कोपरगावाला  सातासमुद्रापार नावलौकिक मिळवून देत असलेली सुरभी कुलकर्णी यांचा सत्कार माहेश्वरी महिला मंडळातर्फे करण्यात आला. याप्रसंगी मंडळाच्या अध्यक्षा सौ. किरण डागा यांनी मनोगत व्यक्त केले.*



*अगदी कोवीड संकटातही लाॅक डाऊनच्या काळात महामारीच्या दहशतीत वावरणाऱ्या महिलांना मानसिक आधार दिला. निर्बंधांमुळे त्यांना ऑनलाईन योगासने प्राणायामाचे धडे दिले. निर्बंध काहीसे शिथील झाल्यानंतर खुल्या मैदानात, सोशल डिस्टंसिंग पाळत योगाभ्यास घेतला गेला. जलनेती सारखी श्वसन मार्ग शुद्धी क्रिया शिकवून सराव करून घेतला. कोवीडच्या संक्रमणापासून आरोग्य सांभाळण्यासाठी नियमित योगाभ्यास आणि खबरदारीचे धडे दिले.*

*या कार्यक्रमास शोभा चांडक, सरला राठी, सुमित्रा कुलकर्णी, रोहिणी पुंडे, सुनिता भुतडा, सुनंदा राठी, रमा झंवर, वर्षा झंवर, संगीता झंवर, मेघा बजाज, सरला डागा, सुवर्णा राठी, आकांक्षा भट्टड, सोमाणी भाभी, कांचन राठी व माहेश्वरी मंडळातील अनेक महिला उपस्थित होत्या.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत