राहुरी फॅक्टरी येथे गुरुदत्त मोबाईल शॉपी दालनाचा सभारंभ संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथे गुरुदत्त मोबाईल शॉपी दालनाचा सभारंभ संपन्न

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील युवराज कॉम्प्लेक्स येथे गुरुदत्त मोबाईल शॉपी दालनाचा शुभारंभ मंगळवारी पार पडला.  चिंचविहिरे य...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-



राहुरी फॅक्टरी येथील युवराज कॉम्प्लेक्स येथे गुरुदत्त मोबाईल शॉपी दालनाचा शुभारंभ मंगळवारी पार पडला.

 चिंचविहिरे येथील होतकरू तरुण किरण शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून राहुरी फॅक्टरी येथे मोबाईल खरेदी-विक्री व दुरुस्ती व्यवसाय करत आहे.



ग्राहकांचा विश्वासाच्या जोरावर किरण शिंदे यांनी नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या युवराज कॉम्प्लेक्स येथे गुरुदत्त मोबाईल शॉपी नूतन दालन सुरू केले असून या दालनाचा राहुरी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन युवराज सुधाकर तनपुरे यांच्या हस्ते पार पडला.


यावेळी माजी नगरसेवक ललित चोरडिया, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विष्णू गीते, राजाभाऊ शेटे, मनसे तालुकाध्यक्ष अनिल डोळस, शिवसेना शहरप्रमुख विजय गव्हाणे आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी दत्तात्रय शिंदे, किरण शिंदे, सचिन शिंदे आदिंसह शिंदे परिवार प्रयत्नशील होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत