सात्रळ /वेबटीम:- अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय मांची हिल, आश्वी बु व सात्रळ ग्रामपंचायत यांच्या सौजन्याने सात्रळ येथे भव्य सर्व...
सात्रळ /वेबटीम:-
अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय मांची हिल, आश्वी बु व सात्रळ ग्रामपंचायत यांच्या सौजन्याने सात्रळ येथे भव्य सर्व रोग निदान शिबीर पार पडले. शिबिराचे उदघाटन सात्रळ ग्रामपंचायत चे सरपंच सतिष ताठे, उपसरपंच तांबोळी यांच्या हस्ते व अश्विन आयुर्वेद विद्यालयाचे डॉक्टर तसेच उपस्थित प्रतिष्ठ नागरिकांच्याउपस्थितीत झाले. सदर शिबिरात रुग्णांची संपूर्ण तपासणी मोफत होती. या शिबिरात गुढघे दुखी, सांधे दुखी, आमवात, संधिवात, मणक्याचे विकार, जुनाट कावीळ, आम्लपित्त, मूळव्याध, नेत्र तपासणी, रक्त गट तपासणी, महिलांसंदर्भातील आजार, मूत्र विकार निगडित आजार, बालरोग तपासणी होऊन रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. पुढील आवश्यक उपचार महाविद्यालयाच्या रुग्णालयातील पंचकर्म विभागात सवलतीच्या दारात उपलब्ध होणार आहेत. शिबीर यशस्वी कारणासाठी अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव लोखंडे, उपप्राचार्य डॉ. खंडीझोड व त्यांच्या सहकारी स्टाफ ने परिश्रम घेतले. शिबिरातील डॉक्टर्स, स्टाफ साठी सात्रळ ग्रामपंचायतीच्या वतीने अपोल्हार देण्यात आला. आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांची झूबंड आढळून येत होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत