राहुरी/वेबटीम:- 'त्याच्या'मध्ये 'त्या' ठिकाणी मागच्या दहा वर्षात तुमचे दिल्लीपर्यंत सरकार होते, तेव्हा तुम्ही एखादे सबस्...
राहुरी/वेबटीम:-
'त्याच्या'मध्ये 'त्या' ठिकाणी मागच्या दहा वर्षात तुमचे दिल्लीपर्यंत सरकार होते, तेव्हा तुम्ही एखादे सबस्टेशन किंवा अन्य विजेच्या प्रश्नाबाबत काय काम केले याच आधी उत्तर द्या असे आवाहन ना.प्राजक्त तनपूरे यांनी माजी.आ.कर्डीले यांना केले आहे.
पाथर्डी तालुक्यातील शिराळ येथे विविध विकास कामाचा शुभारंभसोमवारी ना.प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते पार पडला प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी संभाजी पालवे, तिसगाव चे सरपंच काशिनाथ पाटील लवांडे, पंचायत समिती सदस्य, राहुल गवळी, शिराळ चे सरपंच रवींद्र मुळे, उपसरपंच अमोल घोरपडे ,अमोल वाघ, जालिंदर वामन, सुभाष गवळी, संतोष गरुड, महादेव कुटे, सुधाकर वांढेकर ,राजू शेख, पोपटराव आव्हाड ,विजय पालवे, किरण शेलार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे , नितीन बाफना, राजेंद्र गीते आदी उपस्थित होते.
शिराळ व परिससराचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नवीन सबस्टेशनची मंजुरी आलेली असून कागदपत्रांची पूर्तता होचाच सदर सबस्टेशनचे लोकार्पण केले जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी मिरी सबस्टेशनचे प्रलंबित काम मार्गी लावले असता समोरच्या काही मंडळींना हे काम पूर्ण होणार आहे याची कुणकुण लागताच काही ५ ते १० मंडळींनी सबस्टेशन परिसरात जाऊन आंदोलनाचा दिखावा करून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतात. एवढीच जर तुम्हाला हौस असली तर 'त्याच्या मध्ये 'त्या' ठिकाणी मागील १० वर्षात तुमचं दिल्ली पर्यंत सरकार होत तेव्हा का नाही? सबस्टेशन अथवा ट्रान्सफॉर्मर बसवले नाही .
मागच्या १० वर्षात तुम्ही विजेच्या बाबतीत तुम्ही काय कामे केली याचे आधी उत्तर द्यावे आज मी शिराळच सबस्टेशन मंजूर झालं असे सांगितल मात्र आता ह्या ठिकाणी आंदोलन होऊ नये.
गेल्या काही वर्षांपूर्वी आ. बबनराव पाचपुते पालकमंत्री असताना वांबोरी चारी साठी माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी वांबोरी चारीसाठी निधी मंजूर करून आणला वांबोरी चारी चालू होणार असे 'त्याच्यामध्ये त्या'ठिकाणी' समजल्यावर लगेच आंदोलनाची रिक्षा फिरली, ही भाजप वाल्यांची नौटंकी तथापी जुनी खोड असून दिल्ली पासून ते गल्ली पर्यंतची शिकवण असल्याची टीका ना.तनपुरे यांनी केली. परंतु माझं असं काम नाही , जे आहे,जे होण्या सारख आहे ते होणार, जे नाही ते नाहीच ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतोय असे ना.तनपुरे म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत