राहुरी(वेबटीम):- मराठा आरक्षण संदर्भात मुंबई येथे खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी उपोषण सुरू केले अडून त्या उपोषणास पाठिंबा म्हणून राह...
राहुरी(वेबटीम):-
मराठा आरक्षण संदर्भात मुंबई येथे खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी उपोषण सुरू केले अडून त्या उपोषणास पाठिंबा म्हणून राहुरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहुरी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे
राहुरी तहसील या ठिकाणी उपोषणाला वंचित बहुजन आघाडीचे कार्यकते उपोषणांस बसले आहे पाठिंबा देऊन सरकारचा निषेध नोंदविण्यात आलाय.
या प्रसंगी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला व. छत्रपती संभाजीराजे यांच्या मागणी मान्य करून उपोषण तात्काळ सोडवून घ्यावे अशी मागणी केली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव अनिल जाधव,जिल्हा प्रवक्ते निलेश जगधने, जिल्हा सचिव बाबासाहेब साठे, तालुकाध्यक्ष संतोष चोळके, शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे, संदिप कदम, विशाल राऊत, सतिष बोरूडे, संदीप गाडेकर, नेवासा तालुका अध्यक्ष उदय कर्डक, संदिप कोकाटे, देवळाली प्रवरा शहराध्यक्ष साईनाथ बर्डे, राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष नवनाथ गजर,पोपटराव शेलार, सुनील जगधने , भाऊसाहेब पटेकर, सोमनाथ किर्तने तसेच एकलव्य आदिवासी आघाडीचे तालुकाध्यक्ष पोपटराव शेलार, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शंकरराव शेलार आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत