कोपरगावचे स्वच्छतादूत आदिनाथ ढाकणेंचा राजीनामा? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावचे स्वच्छतादूत आदिनाथ ढाकणेंचा राजीनामा?

  कोपरगाव / प्रतिनिधी सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असणारी कोपरगाव नगरपालिका आता वेगळ्याच कारणांनी चर्चेत येऊ लागली आहे. पालिकेचे स्...

 कोपरगाव / प्रतिनिधी



सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असणारी कोपरगाव नगरपालिका आता वेगळ्याच कारणांनी चर्चेत येऊ लागली आहे. पालिकेचे स्वच्छतादूत तथा गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी ‘स्वच्छता व पर्यावरण दूत’ पदाचा राजीनामा पालिका प्रशासनाला सादर केला आहे. यामुळे शहरात वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे.



कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे हे कायमच सामाजिक उपक्रम राबवत असतात. या पार्श्वभूमीवर पालिकेने आदिनाथ ढाकणे यांची 4 फेब्रुवारी, 2022 रोजी माझी वसुंधरा अभियान 2.0 करीता स्वच्छता व पर्यावरण दूत म्हणून नेमणूक केली होती. त्यानंतर ढाकणे यांची स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देत नागरिकांचे प्रबोधन करुन उपक्रमही राबविले. परंतु, वैयक्तिक व कौटुंबिक कारणांमुळे या निवडीसाठी पूर्ण वेळ देऊ शकत नसल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.





यामुळे पालिका प्रशासनात खळबळ उडाली असून, शहरवासियांत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. तत्पूर्वी आदिनाथ ढाकणे यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही शहर स्वच्छतेला प्राधान्य दिलेले आहे. याचबरोबर इतरही सामाजिक उपक्रम कायमच राबवत असतात. त्यामुळे त्यांच्या राजीनामा पत्रावर पालिका काय निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत