राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- राहुरी फॅक्टरी येथील शिंदे वस्ती परिसर येथे महाशिवरात्री निमित्ताने ओंकारेश्वर मित्र मंडळाच्या वतीने १ मार्च २०२२...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-
राहुरी फॅक्टरी येथील शिंदे वस्ती परिसर येथे महाशिवरात्री निमित्ताने ओंकारेश्वर मित्र मंडळाच्या वतीने १ मार्च २०२२ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
१ मार्च रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प श्री.जयेश महाराज भाग्यवंत (झी टॉकीज, मन मंदिरा फेम) डोंबिवली , मुंबई यांचे जाहीर हरिकीर्तन व त्यानंतर खिचडी प्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
याच दिवशी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत भागवताचार्य ह.भ.प दुर्गाप्रसाद महाराज तिडके यांचे प्रवचन होणार आहे. ओंकारेश्वर मंदिर, शिंदे वस्ती, श्रीरामपूर रोड, राहुरी फॅक्टरी येथे होणाऱ्या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ओंकारेश्वर मित्र मंडळ यांनी केले आहे.
राहुरी फॅक्टरी येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्यावतीने महाशिवरात्रि निमित्ताने कलियुगाचे महापरिवर्तन सतयुगात अर्थात ८ फुटी भव्य दिव्य शिवलिंग दर्शन स्वर्गाचा चैतन्य देखावा या कार्यक्रमाचे आयोजन १ व २ मार्च रोजी वृंदावन कॉलनी, श्रीरामपूर रोड येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के,माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम,राहुरी पंचायत समितीचे कृषी अधिकारी गोरक्षनाथ खळेकर आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहे.
तरी या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय राहुरी फॅक्टरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
राहुरी फॅक्टरी येथील सोमेश्वर मित्र मंडळाच्या वतीने सोमेश्वर वसाहत अंबिका नगर येथे महाशिवरात्रि निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.
१ मार्च २०२२ रोजी रात्री ८ वाजता ह.भ.प बाबा महाराज मोरे यांचे प्रवचन तर 2 मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता ह.भ.प भागवताचार्य अर्जुन गिरीजी महाराज यांचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत