राहुरी : वेबटीम राहुरी तालुक्यात अग्रेसर समजल्या जाणाऱ्या उंबरे सोसायटीची निवडणूक मोठी चुरशीची होणार आहे. त्यात, संभाव्य उंबरे झेडपी ...
राहुरी : वेबटीम
राहुरी तालुक्यात अग्रेसर समजल्या जाणाऱ्या उंबरे सोसायटीची निवडणूक मोठी चुरशीची होणार आहे. त्यात, संभाव्य उंबरे झेडपी गटांतील रंगीत तालीम म्हणून ह्या निवडणुकीकडे पाहिले जात असून, सर्वच पक्षांचे वरिष्ठ नेते या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष ठेवून असणार आहेत. या निकालावरच उंबरे गटातील उमेदवारी अंतिम केली जाणार आहे.राहुरी तालुक्यात उंबरे गाव हे तालुक्याचे राजकीय केंद्रबिंदू बनले आहे. येथे तनपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेव ढोकणे, माजी संचालक साहेबराव दुशिंग, माजी संचालक सुनील अडसुरे, माजी संचालक नवनाथ ढोकणे हे चार बडे नेते तालुक्यात आपला दबदबा निर्माण करणारे आहेत. सध्या ही सोसायटी सुनील अडसुरे गटाकडे आहे. या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यामुळे निवडणुकीसाठी प्रशासकीय हालचालीना वेग आला आहे. सोसायटीची सुमारे 1500 पेक्षा अधिक सभासदांची अंतिम यादी आज 28 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार आहे.त्यानंतर प्रोग्रॅम लागणार आहे. तत्पूर्वीच, गावातील राजकीय वातावरण गरम झाले आहे. कारखान्याचे चेअरमन ढोकणे हे स्वतःचा पॅनल उभा करण्याचे धाडस दाखवू शकत नाही, ते सत्ताधारी गटाचे नेते सुनील अडसुरे यांच्यामागे ते आपली ताकद उभी करतील, असा राजकीय अंदाज आहे. तर, तुल्यबळ विरोधक म्हणून कारखान्याचे माजी संचालक साहेबराव दुशिंग, जेष्ठ नेते कारभारी ढोकणे, गंगाधर ढोकणे, इंजि गोरक दुशिंग, विलासराव ढोकणे, कैलास अडसुरे, नानाखंडु ढोकणे, इत्यादीनी सोसायटी ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. सत्ताधारी गटाचे नेतृत्व सुनील अडसुरे यांच्याकडे असणार आहे, ते आपल्या कार्यकाळातील स्वच्छ व पारदर्शक कारभार, शेतकरी हिताच्या राबवलेल्या योजना, शेतकऱ्यांना सुलभरीत्या वाटप केलेले पीक कर्ज, संस्थेचे केलेली घोडदौड, सभासदांना केलेले डिव्हिडंट वाटप, संस्थेत सर्वसामान्य कुटुंबाना पदे देऊन दिलेली संधी, इत्यादी विषय ते प्रचारात हाताळू शकतात, तर विरोधी गटातून एकाधिकारशाही, पीक कर्ज वाटपात लोकांची झालेली अडवणूक, कायम तोट्यात असलेले रेशन दुकान, मतदारांची कमी झालेली नावे, लाभांश वाटप इत्यादी विषयावरून सत्ताधाऱ्यांची कोंडी करू शकतात. सध्या तरी अडसुरे गट हा जनसंपर्क, राजकीय ताकद, घोडेबाजाराची क्षमता, यांमुळे वरचढ दिसत असला तरी सर्वसामान्य जनता ऐनवेळी काय भूमिका घेते, त्यावरच खरा निकाल समजणार आहे.
गेल्या पाच वर्षांपूर्वी कारखान्याचे संचालक नवनाथ ढोकणे यांनी सर्व नेत्यांच्या विरोधात सवता सुभा उभा केला होता, त्यात त्यांना सत्ता मिळविण्यात अपयश आले असले तरी, त्यांच्या पार्टीतील काही संचालक निवडणून आले, तर काही लोक थोड्या मताने पराभूत झाले होते, त्यामुळे त्यांच्या मागे मोठा जनसमुदाय असल्याचे दिसून आले. आता पुन्हा निवडणूक लागली आहे, त्यात ते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष असणार आहे. ते साहेबराव दुशिंग यांच्यासोबत जाणार की ग्रामपंचायतीप्रमाणेच सुनील अडसुरे यांच्या व्यासपीठावर दिसणार? यावर निकाल अवलंबून असणार, असेही बोलले जात आहे. सध्या तरी ढोकणे वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे पहायला मिळत आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीत कारखान्याचे माजी संचालक साहेबराव दुशिंग, कारभारी ढोकणे, इंजि गोरक दुशिंग,विलासराव ढोकणे, प्रा रामकृष्ण ढोकणे यांनी सत्ताधारी गटाचे कारखान्याचे चेअरमन नामदेव ढोकणे, सुनील अडसुरे यांच्या विराधात पॅनल उभा केला होता.त्यात, जनतेची लाट उसळली होती, निकालात 15 पैकी 9 जागांवर विजय देऊन जनतेने त्यांच्यावर विश्वास दर्शवला होता. तीच लाट सोसायटी निवडणुकीत दिसेल, असा विरोधकाना विश्वास वाटत आहे.ग्रामपंचायतीत 9 सदस्य जनतेने निवडून दिले, तरीही विरोधक गावचा विकास करण्यात अपयशी ठरले आहेत. जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. ज्यांना धड ग्रामपंचायत चालवता आली नाही, ते सोसायटी काय चालवणार, असा आरोप सत्ताधारी गटातून विरोधकांवर केला जाणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत