राहुरी/प्रतिनिधी:- मराठा आरक्षण संदर्भात मुंबई येथे खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी उपोषण सुरू केले असून या उपोषणास पाठिंबा म्हणून राहु...
राहुरी/प्रतिनिधी:-
मराठा आरक्षण संदर्भात मुंबई येथे खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी उपोषण सुरू केले असून या उपोषणास पाठिंबा म्हणून राहुरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
मराठा समाजाचा प्रदीर्घ काळापासून चालू असलेल्या आरक्षण लढ्यास यश प्राप्त होण्यासाठी बहुजन प्रतिपालक छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. त्यांना राहुरी येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलाय. तसेच पाठिंबा म्हणून आज २८ फेब्रुवारी रोजी राहुरी तहसील कार्यालय समोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला. या प्रसंगी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष डाॅ. विजय मकासरे, जिल्हा प्रवक्ते निलेश जगधने, जिल्हा सचिव बाबासाहेब साठे, तालुकाध्यक्ष संतोष चोळके, संदिप कदम, विशाल राऊत, सतिष बोरूडे, संदीप गाडेकर, देवळाली प्रवरा शहराध्यक्ष साईनाथ बर्डे, पोपटराव शेलार, सुनील जगधने आदि उपोषणात सहभागी होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत