राहुरी/वेबटीम:- मराठा समाजातील तरुणांना उद्योग व्यवसाय वाढीसाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून घेतलेल्या कर्ज प्रकरणाच्या व्याज पर...
राहुरी/वेबटीम:-
मराठा समाजातील तरुणांना उद्योग व्यवसाय वाढीसाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून घेतलेल्या कर्ज प्रकरणाच्या व्याज परतावा योजनेचा फज्जा उडाल्याने संतप्त झालेल्या लाभार्थ्यांनी ना.अजित पवार यांना तहसिलदार शेख यांच्या माध्यमातून पत्र पाठवले आहे.
पत्रात म्हंटले आहे की ,मराठा तरुणांना उद्योग/व्यवसाय वाढीसाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कामकाजा विषयी मराठा समाजातील उद्योजक/व्यावसायिक तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे.एकीकडे बँक कर्जप्रकरणे देण्यास टाळाटाळ करत आहेत.मोठ्या अडचणीवर मात करत मराठा समाजातील उद्योजक / व्यावसायिक तरुणांनी बँकांकडून कर्ज प्रकरणे मंजूर करून घेतलेली आहे.त्यांना व्यवस्थित व्याज परतावा मिळत नाही.
ज्यांची कर्ज प्रकरणे बँक मध्ये दिलेली आहे ,परंतु अद्याप बँकांनी कर्ज प्रकरणे मंजूर न केल्यामुळे मराठा समाजातील उद्योजक / व्यावसायिक तरुण मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहे.मराठा तरुणांनी आपल्याला येणाऱ्या अडचणी आपल्या व्यथा कुणाकडे मांडाव्यात हे सुचत नसल्याने हवालदिल झालेले आहेत.
ज्या व्यावसायिक तरुणांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनेच्या माध्यमातून कर्ज प्रकरणे घेतली आहेत, त्यांना व्याज परतावा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्यात असे समजते आहे की नुकतेच महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कॅश क्रेडिट योजना (cc- खेळते भांडवल) कर्ज प्रकरणे बंद करण्याचा परस्पर निर्णय घेण्यात आला आहे .महामंडळाचे अधिकारी कुठलेही परिपत्रक न काढता जिल्हा समन्वयक यांना परस्पर तोंडी सांगून नियम बदलले जातात. बदलेल्या नियमांचे महामंडळाच्या पोर्टलवर कुठल्याही प्रकारचे परिपत्रक काढले किंवा टाकले जात नाही.महामंडळावर कोणाचेही नियंत्रण नसल्याची भावना लाभार्थ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. सध्या महामंडळाचे कार्यकारी अधिकारी यांनी नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या अचानक बंद केल्या आहेत. ज्या लाभार्थ्यांनी अशा फायनान्स कंपन्यांकडून साधने घेतली आहेत किंवा कर्ज घेतलेली आहेत असे लाभार्थी महामंडळाच्या कठोर भूमिकेमुळे अडचणीत सापडले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात जवळजवळ(१०००) एक हजार च्या पुढे व्याज परतावा प्रकरण(होल्ड वर गेलेले) थांबवण्यात आलेले आहे. तसेच बँकेकडून मंजूर झालेले कर्ज प्रकरणे (५००) पाचशेच्या वर प्रलंबित झालेले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात १४ तालुके आहेत.क्षेत्रफळाच्या दृष्टीने नगर जिल्हा मोठा असल्याने किमान महामंडळाचे ३ समन्वयक नियुक्ती होणे अपेक्षित असताना केवळ एक समन्वयक सध्या काम पहात आहे.
तसेच आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे ,असे म्हटले जाते. याच अनुषंगाने महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी किंवा शेती पूरक व्यवसाय म्हणून ट्रॅक्टर कर्ज प्रकरणे दिले जात होते.परंतु ते कर्ज प्रकरणे देखील बंद करण्यात आलेली आहे.ट्रॅक्टर प्रकरण महामंडळाच्या योजनेतून चालू केल्यास शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे. व्याज परतावा योजना असल्यामुळे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे लाभार्थी बॅंकांचे कर्ज परतफेड व्यवस्थित रित्या करत आहेत.परंतु अण्णासाहेब पाटील महामंडळावर सरकारचे नियंत्रण न राहिल्यामुळे मराठा समाजातील उद्योजक व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे.बँकेने कर्ज प्रकरणाचा हप्ता भरण्यासाठी जी तारीख दिली आहे ती तारीख सोडून त्याच महिन्यात तीन ते चार दिवसांनी बँक हप्ता उशिरा भरल्यास महामंडळाकडून व्याज परतावा दिला जात नाही.लवकरात लवकर अण्णासाहेब पाटील महामंडळा विषयीच्या अडचणी सोडवून लाभार्थ्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
वेळीच दखल न घेतल्यास अखिल भारतीय छावा संघटना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांना सोबत घेऊन महामंडळाच्या मुंबई येथील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे पाटील यांनी दिला आहे. यावेळी प्रशांत मुसमाडे,डॉ.भारत टेमक,अक्षय कोहकडे,अविनाश क्षिरसागर,कैलास गाडे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत