राहुरी(वेबटीम):- दरवर्षीप्रमाणे यही वर्षी राहुरी तालुका शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शहरातील संत ...
राहुरी(वेबटीम):-
दरवर्षीप्रमाणे यही वर्षी राहुरी तालुका शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शहरातील संत गाडगेबाबा आश्रम शाळेच्या प्रांगणात अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सामाजिक उपक्रम हाती घेऊन शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार असून विविध संघटनांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला आहे. शिवजयंती सोहळा शिवप्रेमी नागरीकांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
राहुरी तालुका शिवजन्मोत्सव समितीचे वतीने गेली चार वर्षा पासून शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या ही वर्षी संत गाडगेबाबा आश्रम शाळेच्या प्रांगणात शिवप्रतिमा पुजन सकाळी १० वाजता शहरातील जेष्ठ नागरीकांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे संत गाडगेबाबा आश्रम शाळेच्या मुलांना शालेय साहित्य तसेच फळ वाटप करण्यात येणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ, शिव प्रतिष्ठान, संभाजी ब्रिगेड, मोर्या ग्रुप, महाराणा प्रतिष्ठान, जेष्ठ नागरिक संघटना, कोरोना वॉरीयर्स टीम, हरणाई ग्रुप, संत सांवता माळी युवक महासंघ आदी संघटनांचा सहभाग असणार आहे.
सदरचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवाजीराव डौले, डॉ. प्रकाश पवार, अॅड. राहुलभैय्या शेटे, रमेश बोरुडे, मच्छिंद्र गुंड, आबासाहेब शेटे, गोरक्षनाथ अडसुरे, अशोकराव तुपे, राजेंद्र खोजे, राजेंद्र काळे, अनिलशेठ गावडे, प्रदीप भुजाडी, कांताशेठ तनपुरे, राजा भोरे, सचिन बोरुडे, डॉ. किशोर पवार, डॉ. नरेंद्र इंगळे, अतुलशेठ तनपुरे, जीवन गुलदगड, बाळकृष्ण वाघ, सदाशिव पवार सर, यशवंतराव डावखर, जगन्नाथ सूर्यवंशी सर आदी पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत