राहुरी /वेबटीम:- शिवजयंती शांतेत साजरी करावी कुठेही डीजे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल शासनाच्या नियमांचं पालन करत शांततेत शिवजय...
राहुरी /वेबटीम:-
शिवजयंती शांतेत साजरी करावी कुठेही डीजे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल शासनाच्या नियमांचं पालन करत शांततेत शिवजयंती साजरी करून प्रशासनाला सहकार्य करावे अस आवाहन पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांनी केले
बुधवार दि.16 फेब्रुवारी रोजी राहुरी तहसील कार्यालयामध्ये तहसिलदार फसोद्दिन शेख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये प्रशासनाने ही बैठक आयोजित केली होती कोरोना नियमाच्या काही अटी शिथील झाल्या असल्या तरी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार शिवजयंती साजरी करावी डीजे मुक्त मिरवणूक काढावी कुठेही आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील पोलीस निरीक्षक यांनी दिला आहे
सालाबादप्रमाणे राहुरीतील शिवजयंती उत्सव शांततेत पार पाडू अशी ग्वाही शिवजयंती उत्सवाचे देवेंद्र लांबे यांनी दिली याप्रसंगी राहुरी तालुक्यातील शिवजयंती उत्सवातील कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत