राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- कणगर येथे जिल्हा परिषद शाळा वरघुडेवस्ती, गाढे वस्ती, जि.प. शाळा कणगर, न्यू प्रसाद माध्यमिक विद्यालय कणगर, ग्रामपंचाय...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
कणगर येथे जिल्हा परिषद शाळा वरघुडेवस्ती, गाढे वस्ती, जि.प. शाळा कणगर, न्यू प्रसाद माध्यमिक विद्यालय कणगर, ग्रामपंचायत या ठिकाणी विविध कार्यक्रमांनी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.
त्यानंतर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रथामधून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी नंतर शालेय विद्यार्थी व शिवचरित्रकार हसन सय्यद यांचे व्याख्यान संपन्न झाले.
यावेळी राहुरीचे तहसीलदार फसियोद्दिन शेख यांनी कार्यक्रमाला भेट दिली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य भास्कर गाढे, सरपंच श्री सर्जेराव घाडगे, सुयोग नालकर, नवनाथ मुसमाडे, अनिल घाडगे, बाबा गाढे, संदीप घाडगे, राजेद्र दिवे, सुहास उर्हे, बाळासाहेब गाढे,नारायण घाडगे, संतोष गाढे,सुनील शेटे, रवी वरघुडे, दादा वरघुडे, बाळासाहेब मुसमाडे, किरण गव्हाणे, भगवान घाडगे, भाऊसाहेब दिवे धनंजय बर्डे, पेरणे सर, काकडे सर यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत