जनतेला पाणी हवंय, वाद नको-विजय वहाडणे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जनतेला पाणी हवंय, वाद नको-विजय वहाडणे

  कोपरगाव/वेबटीम:-   अनेक वर्षांपासून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटू शकलेला नाही.त्यासाठी कोण जबाबदार आहेत,हा विषय अतिशय वादग्रस्त आहे.एकमे...

 कोपरगाव/वेबटीम:-


 अनेक वर्षांपासून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटू शकलेला नाही.त्यासाठी कोण जबाबदार आहेत,हा विषय अतिशय वादग्रस्त आहे.एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होऊ नयेत म्हणूनच मी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत कोपरगावसाठी दारणा व निळवंडे  या दोन्ही धरणांतून असलेले पाणी आरक्षण अबाधित ठेवावे असा विषय मांडला व तसा  ठरावही सर्वानुमते करण्यात आला.कारण शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढती असल्याने येणाऱ्या काळासाठीही पाणीसाठवन वाढविणे महत्वाचे आहे.



               नवीन पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी लागणाऱ्या बहुतांश मान्यता ,प्रक्रिया पूर्णत्वास गेलेल्या आहेत.लवकरच पाच नंबर साठवण तलाव झाल्यानंतर पाणी साठवण क्षमता वाढणारच आहे.त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे यात शंका नाही.निळवंडे पाणी योजना पुर्णत्वास गेल्यानंतर मिळणारे पाणी साठवण करण्यासाठी साठवण क्षमता तयार असणेही गरजेचे आहे.पाणी कुठूनही आले तरी ते पाणी जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करूनच पाणी पुरवठा केला जातो हे सर्वांनाच माहीत आहे.याबाबत सध्या सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोप यामुळे जनमत विचलित होऊ शकते याचे भान सर्वांनीच ठेवले पाहिजे.पाणी कुठूनही येऊ द्या पण आम्हाला नियमित पाणी द्या हीच जनतेची अपेक्षा आहे.

                   म्हणूनच पाच नंबर साठवण तलाव आणि नियोजित निळवंडे पाणी योजना पुर्णत्वास नेण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत.कोपरगावच्या नागरिकांचे कुठल्याही आरोप प्रत्यारोप,राजकारण यापेक्षा पाणी समस्येवर तातडीने उपाय करणे यावरच लक्ष आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत