कोपरगाव प्रतीनिधी:- कोपरगाव शहरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे व शहरप्...
कोपरगाव प्रतीनिधी:-
कोपरगाव शहरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे व शहरप्रमुख कलविंदर सिंग यांच्या मागदर्शनाखाली मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आहे. दि १९ फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. याप्रसंगी प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने तमाम भारतीयांना शुभेच्छा देऊन शहरातील धारणगांव रोड,पुणतांबा चौफुली निवारा, विठ्ठल नरहरी मंदिर त्याचप्रमाणे शिवसेनेच्या शाखेच्या विविध ठिकाणी भेटी देऊन अभिवादन करण्यात आले उपशहरप्रमुख अश्विनीताई होने यांनी शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने गड किल्लेचे प्रदर्शन शाळेत भरविले होते. अतिशय सुंदर गड किल्ले प्रदर्शन असल्याने गड किल्ल्यांची- माहिती आजच्या तरूणांच्या ज्ञानात भर पाडणारी होती.
त्याच प्रमाणे सध्याकाळी शिव व्याख्यते सुरज तुवर सर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले गड किल्ले प्रर्दशन मध्ये सहभागी स्पर्धकांना बक्षिस वितरण यावेळी करण्यात आले आहे.अशा विविध उपक्रमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली आहे, याप्रसंगी जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, शहर प्रमुख कलविंदरसिंग दडियाल ज्येष्ठ शिवसैनिक दिलिप आरगडे, अहमदनगर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विशाल झावरे,वाहतूकसेना जिल्हाप्रमुख इरफान शेख,कोपरगाव शिवसेना सचिव बाळासाहेब साळुंके,प्रवक्ते राहुल देशपांडे,उपशहरप्रमुख विकास शर्मा,किरण अंडांगळे,शेखर कोलते,योगेश उशिर,प्रफुल्ल शिंगाडे,सुनील कुंढारे,संघटक वैभव गिते,दिनेश भालेराव,राजु सोळसे,मधु पवार,मंगेश देशमुख,शैलेश वाघ,प्रवीण शेलार,अविनाश धोक्रट,अशोक पवार,शैलश वाघ,किरण खर्डे,सतिष खर्डे,विक्रांत खर्डे,भुषण वडांगळे,विक्रांत झावरे,विकास शर्मा, प्रवीण शिंदे,विजय शिंदे, सचिन मोरे, रविंद्र पवार, यांच्या सह शिवसेनेचे पदाधिकारी शिव प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत