कोपरगाव/वेबटीम:- तालुक्यातील वारी येथील ग्रामपंचायत कार्यालय, जय बाबाजी भक्त, परिवार व राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट ...
कोपरगाव/वेबटीम:-
तालुक्यातील वारी येथील ग्रामपंचायत कार्यालय, जय बाबाजी भक्त, परिवार व राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट तसेच ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने देशाच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त सोमवारी ( दि.१४ ) सकाळी ६ ते ९.३० यावेळेत महाश्रमदान सोहळा व परिसर स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले.
या अभियानात गावातील श्री. रामेश्वर विद्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, सरकारी दवाखाना परिसर, कर्मचारी निवासस्थान, बडोदा बँक परिसर, पोस्ट ऑफिस, बसस्थानक ते बालाजी मंदिर मेनरोड परिसर, ज्ञानसाई हॉस्पिटल व महेश काबरा किराणा दुकान परिसर, अंबिका डेअरी शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसर, शनि मंदिर परीसर, पोस्ट गल्ली, लहान देवी मंदिर, रामेश्वर मंदिर व परिसर, हनुमान मंदिर, रेणुका माता मंदिर, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मंदिर परिसर, मज्जीद परिसर, पोलिस स्टेशन परिसर, अंगणवाडी परिसर या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत सुमारे चार ट्रॅक्टर कचरा संकलित करण्यात आला तर उर्वरित कचरा जाळण्यात आला. या अभियानातून गावातील सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता झाल्याने ग्रामस्थांनी उपक्रमाचे स्वागत केले.
या अभियानात वारीचे सरपंच सतीश कानडे, ग्रामविकास अधिकारी दिलीप वारकर, जय बाबाजी भक्त परिवाराचे भाऊसाहेब टेके, सामाजिक कार्यकर्ते मधुकर टेके, जीत अकडमीचे संचालक जितेंद्र टेके, "लोकमत"चे उपसंपादक रोहित टेके, विजय निळे, नितीन निकम, कृष्णराव जाधव, मधुकर सोनवणे, अंबादास गिरी, बाळासाहेब वाघमारे, मकरंद देशपांडे, सुभाष पवार, अश्विनी खैरनार, गोपीनाथ सोळशे, गणेश मैराळ, काशिनाथ साळवे, गोरख सोनवणे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी रावसाहेब वाघ, सतीश गायकवाड, विलास जगधने, मनोज जगधने, बबन टेके, मछिंद्र गागरे, उषा बागुल, नंदा महिरे, शेषराव रगडे, पोपट बनकर, संदीप आगे, चेतन वाळुंज यांच्यासह गावातील स्वच्छता प्रेमींनीं यात सहभागी होऊन गाव स्वच्छतेच्या या अभियानात आपले श्रमरुपी योगदान दिले.
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत