राहुरी/वेबटीम:- राहुरी शहरातील खाटीक गल्ली येथे कत्तलीसाठी आलेल्या १९ गोवंश जनावरांची पोलिसांनी मुक्तता केली आहे तर राजवाडा परिसरातील अवैध ...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी शहरातील खाटीक गल्ली येथे कत्तलीसाठी आलेल्या १९ गोवंश जनावरांची पोलिसांनी मुक्तता केली आहे तर राजवाडा परिसरातील अवैध हातभट्टी दारू अड्डा उध्वस्त केला आहे. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.
राहुरी शहरातील खाटीक गल्ली परिसरात कत्तीलीसाठीची गोवंश जनावरांची राहुरी पोलिसांनी मुक्तता केली असून या ठिकाणी असलेले गोमांस जप्त केले आहे.
राहुरी शहरातील खाटीक गल्ली परिसरात कत्तलखाना सुरू असून या ठिकाणी गोवंश जनावर असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांना मिळाली त्यानुसार आज सकाळी पोलीस निरीक्षक दराडे यांनी छापा टाकून १९ लहान-मोठी गोवंश जनावरे ताब्यात घेतली असून काही गोमांस ताब्यात घेतले आहे.
याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती
तर राहुरी शहरातील राजवाडा परिसरात अवैध हातभट्टी दारू अड्यावर पोलीसांनी छापा मारत दारू अड्डा उध्वस्त केलाय. त्यामुळे अवैध व्यवसायीकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
राजवाडा परिसरात पोलिस निरीक्षक प्रतापराव दराडे यांनी पोलिस फौजफाटा बरोबर घेत या अवैध हातभट्टी दारू निर्मिती करणणा-या ठिकाणी धडक छापा मारत,दारूचे रसायने, साहित्य उध्वस्त करण्यात आले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती. पोलीस निरीक्षक दराडे यांनी केलेल्या कारवाईमुळे सामान्य नागरिकांतून स्वागत होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत