सात्रळ/वेबटीम:- राहुरी भाजपा चे तालुका अध्यक्ष अमोल भनगडे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यामुळे रिक्त झालेल्या भाजपा ...
सात्रळ/वेबटीम:-
राहुरी भाजपा चे तालुका अध्यक्ष अमोल भनगडे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यामुळे रिक्त झालेल्या भाजपा तालुका अध्यक्ष पदी सात्रळ येथील विश्वासराव कडू यांची नेमणूक होण्याची मागणी प्रवरा नदीलगतच्या" प्रवरा "परिसरातील कार्यकर्त्यांनी पक्ष श्रेष्टींकडे करणार असल्याची माहिती भाजपा युवा मोर्च्या ओबीसी सेल चे जिल्हा उपाध्यष किरण अंत्रे, तालुका भाजपा उपाध्यक्ष नारायण धनवट, भाजपा ओबीसी युवा मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस बिपीन ताठे व त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी दिली असून यासाठी ते लवकरच आमदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच खासदार सुजयदादा विखे पाटील, मा. आ. शिवाजीराव कर्डीले यांना भेटून मागणीचे निवेदन देणार आहेत.
किरण अंत्रे यांनी पूढे असे म्हटले आहे की विश्वासराव कडू हे या पूर्वी राहुरी पंचायत समिती उपसभापतीपद भूषविले असल्याने त्यांच्या चांगल्या कामाची सर्वसाधारण जनतेला फायदा झालेला दिसून येत होता व त्यांचा तालुक्यातील संपर्क ही दांडगा असून ते आ. राधाकृष्ण विखे पा. यांचे विश्वासू कार्यकर्ते, तसेच तालुक्यात पक्ष संघटना वाढविण्याच्या दृष्टीने योग्य व्यक्ती आहेत. सध्या विश्वास कडू हे विखे पाटील साखर कारखान्याचे उपाध्यक्ष असून त्याना तालूक्यातील राजकीय तसेच सामाजिक परिस्तितींचा पूर्णपणे अभ्यास आहे. त्यांच्या भाजपा तालुका अध्यक्ष पदी नेमणूक होण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत