कोपरगाव प्रतिनिधी :- माजी उपनगराध्यक्ष योगेश तुलसीदास बागुल व नगरसेवक कैलास व्दारकानाथ जाधव यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे उपकार्यकारी अधिकारी सु...
कोपरगाव प्रतिनिधी :-
माजी उपनगराध्यक्ष योगेश तुलसीदास बागुल व नगरसेवक कैलास व्दारकानाथ जाधव यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे उपकार्यकारी अधिकारी सुनील गोरडे यांना मारहाण करून कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यालयात केलेल्या तोडफोडीतून सुनील फंड यांनी माजी उपनगराध्यक्ष योगेश तुलसीदास बागुल व नगरसेवक कैलास व्दारकानाथ जाधव यांच्यावर सात वर्षासाठी अपात्रतेची कारवाई करावी अशा आशयाचे अपील जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे दाखल केले होते. याबाबत गुरुवार (दि.३) मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होवून त्याबाबत जिल्हाधिकारी २२ मार्च रोजी अंतिम निर्णय देणार आहे अशी माहिती अॅड. विद्यासागर शिंदे यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव नगरपरिषदेचे उपकार्यकारी अधिकारी सुनील गोरडे यांना माजी उपनगराध्यक्ष योगेश तुलसीदास बागुल व नगरसेवक कैलास व्दारकानाथ जाधव यांनी कोपरगाव शहरातील अतिक्रमण काढण्याच्या रागातुन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली होती. उपकार्यकारी अधिकारी सुनील गोरडे यांनी अतिक्रमण काढतांना सर्व अतिक्रमणे शासकीय नियमानुसारच काढली. तरीदेखील त्यांच्यावर विद्यमान नगरसेवकांनी शिवीगाळ करून मारहाण करणे योग्य नाही. त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी अशा आशयाचे अपील सुनील फंड यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेद्न भोसले यांच्याकडे दाखल केले होते. जेणेकरून यापुढे असे प्रकार घडणार नाही हा त्यामागे उद्देश होता. त्याबाबत गुरुवार (दि.३) मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेद्न भोसले यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनील फंड यांच्यावतीने अॅड. विद्यासागर शिंदे यांनी बाजू मांडली. तात्कालीन मुख्याधिकारी डोईफोडे यांच्या आदेशानुसार सदर अतिक्रमण काढले असल्याचे अॅड. विद्यासागर शिंदे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. पुढील सुनावाणीच्या वेळी तात्कालीन मुख्याधिकारी डोईफोडे यांच्यासह उपकार्यकारी अधिकारी सुनील गोरडे यांनी उपस्थित राहण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती केली. दोन्ही बाजूंचे म्हणणे जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकून घेवून त्याबाबत अंतिम सुनावणी २२ मार्च रोजी होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. अॅड. विद्यासागर शिंदे यांची मुख्याधिकारी डोईफोडे यांच्यासह उपकार्यकारी अधिकारी सुनील गोरडे यांना उपस्थित राहण्याबाबत केलेली विनंती मान्य करून २२ मार्च रोजी कोपरगाव नगरपरिषदेचे तात्कालीन मुख्याधिकारी डोईफोडे यांच्यासह उपकार्यकारी अधिकारी सुनील गोरडे यांना देखील उपस्थित राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे येत्या २२ तारखेला माजी नगराध्यक्ष योगेश बागुल व नगरसेवक कैलास जाधव सात वर्षासाठी अपात्रतेची कारवाई होणार का? याची उत्सुकता कोपरगाव शहरातील नागरिकांना लागली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत