नाटेगाव -गारदा नाला डांबरीकरण रस्त्याच्या कामा कडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष - अँड.नितीन पोळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नाटेगाव -गारदा नाला डांबरीकरण रस्त्याच्या कामा कडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष - अँड.नितीन पोळ

कोपरगाव/वेबटीम:- नाटेगाव व परिसरातील नागरिकां करिता अत्यंत महत्वाचा असलेला नाटेगाव - गारदा नाला या रस्ताचे डांबरीकरण काम सुरू असून या रस्त्य...

कोपरगाव/वेबटीम:-


नाटेगाव व परिसरातील नागरिकां करिता अत्यंत महत्वाचा असलेला नाटेगाव - गारदा नाला या रस्ताचे डांबरीकरण काम सुरू असून या रस्त्याच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे

आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की नाटेगाव - गारदा नाला हा रस्ता या भागातील नागरिकांना वाहतुकी साठी अत्यंत महत्वाचा रस्ता आहे या रस्त्यावरून नाटेगाव येथील ग्रामस्थां प्रमाणे ब्राम्हणगाव, निमगाव, चिंचोंडी पिंपळगाव आदी भागातील नागरिक प्रवास करतात नाटेगाव पासून नगर मनमाड हाय वे पर्यंत साधारण दोन किमी असलेला हा रस्ता एक किमी येवला हद्दीत तर एक किमी कोपरगाव हद्दीत येतो मात्र नेहमीच या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत असते या पूर्वी साधारण वीस वर्षांपूर्वी माजी आ शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचे डांबरीकरण काम झाले होते त्या नंतर मागील दोन वर्षांपूर्वी येवला तालुका हद्दीतील एक किमी रस्त्याचे काम ना छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने दर्जेदार झाले

सद्या नाटेगाव ते गारदा नाला हे एक किमी चे डांबरीकरण काम सुरू आहे 

मात्र या कामाला कोणतीही लेव्हल नाही,रस्त्यांचा अंदाज घेऊन सपाटीकरण नाही, काही भागात या रस्त्याच्या कामात एक फूट उंची पर्यंत चढ उतार आहे, आहे त्या रस्त्यावर नुसती खडी पसरून दिली असून मंजूर कामा प्रमाणे रस्त्याचे काम होत नाही त्यामुळे या रस्त्याचे काम झाल्या नंतर एकाच वेळी दोन वाहने गेल्यास अगर वाहतूक करणारे ट्रॅक्टर घेऊन गेल्यास ते कधीही दुर्घटना ग्रस्त होऊ शकतात

मात्र या साऱ्या गोष्टी कडे अधिकारी यांनी लक्ष देणे आवश्यक आहे मात्र या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून काम सुरू असतानाच या रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे म्हणून प्रयत्न करावे अन्यथा ग्रामस्थ या रस्त्याचे काम बंद करण्याच्या विचारात आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत