आंबी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील गंगापूर येथील युवा कार्यकर्ते शंतनू खांडके यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या राहुरी तालुका उप...
आंबी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील गंगापूर येथील युवा कार्यकर्ते शंतनू खांडके यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या राहुरी तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली. राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष दिग्विजय शिरसाठ यांनी खांडके यांना निवडीचे पत्र दिले. शंतनू खांडके यांचा प्रवरा पंचक्रोशीत दांडगा जनसंपर्क असून तरुण वर्गात लोकप्रिय आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांचे पुरोगामी विचार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे समाजात तळागाळात रुजवून पक्ष संघटना मजबूत करणे, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तडीस लावणे, ओबीसींसह बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी लढण्याचे काम मिळालेल्या संधीतून केले जाईल असे शंतनू खांडके यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या उपाध्यक्षपदी निवड झालेबद्दल शंतनू खांडके यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत