कोपरगाव / प्रतिनिधी:- शहरातील अतिक्रमण काढून ११ वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने दरवर्षी ११ मार्चला काळा दिवस पाळला जातो. परंतु, अजून कित...
कोपरगाव / प्रतिनिधी:-
शहरातील अतिक्रमण काढून ११ वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने दरवर्षी ११ मार्चला काळा दिवस पाळला जातो. परंतु, अजून किती वर्षे हा दिवस पाळायचा असा सवाल करून कोपरगाव शहरातील विस्थापितांना न्याय देण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र यावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शेख यांनी म्हंटले आहे की, गोरगरीब दुकानदार आनंदाने रोजीरोटी भागविण्यासाठी व्यवसाय करत होते. परंतु, पालिकेने अतिक्रमण काढून अनेकांना धुळीस मिळविले. अनेकांचे घरे उध्वस्त होवून बेघर झाले. आज अनेक व्यापारी भाड्यापट्यावर गाळे घेवुन व्यवसाय करत आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर दरवर्षी ११ मार्चला काळा दिवस पाळला जातो. मात्र, या विस्थापितांना कधी न्याय मिळणार, असा सवाल शेख यांनी केला आहे.
सहा नंबर शाळेच्या पाठीमागे जसे पत्र्याचे शेड मारून गाळे बांधून दिले तशाप्रकारे त्या धर्तीवर ज्याठिकाणी शक्य आहे त्याठिकाणी पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी व सर्वपक्षीयांच्या साथीने कामाला सुरुवात करून विस्थापितांना न्याय देण्याचे काम आता तरी करावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत