राहुरी/वेबटीम:- शनिवार दिनांक 19.03.22 रोजी नांदगाव तालुका नगर येथील रहिवासी बाळासाहेब नन्नवरे यांच्या घरात दुपारी 3 वाजेच्या दरम्यान एक 2 फ...
राहुरी/वेबटीम:-
शनिवार दिनांक 19.03.22 रोजी नांदगाव तालुका नगर येथील रहिवासी बाळासाहेब नन्नवरे यांच्या घरात दुपारी 3 वाजेच्या दरम्यान एक 2 फुट लांबीचा साप आल्याने दहशत निर्माण झाली त्याला मारण्यासाठी नन्नवरे हे पुढे आल्यानंतर त्या सापाने त्याच्यावर हल्ला चढावला तेव्हा तो नाग असल्याचे समजले.
त्यानंतर नन्नवरे कुटुंबियांनी जवळील सर्पमित्र शाहरुख शेख यांना फोन करून माहिती दिली. शेख हे कामानिमित्त बाहेर गेले असल्याने त्यांनी राहुरी येथील सर्पमित्र मुजीब देशमुख यांना कळवले. काही वेळातच राहुरी येथून सर्पमित्र मुजीब देशमुख हे सर्पमित्र कृष्णा पोपळघट व रोहित जगधने यांच्या सोबत नांदगाव येथे गेले व त्यांनी घरातील कपाटा खाली बसलेल्या अति विषारी नागाला पकडून निसर्ग सानिध्यात सोडले. यावेळी सर्पमित्र पोपळघट यांनी घरात साप येऊ नये म्हणून नन्नवरे कुटुंबाला मार्गदर्शन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत