५ नं.साठवण तलावाला १३१ .२४ कोटीची प्रशासकीय मंजुरी –ना. आशुतोष काळे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

५ नं.साठवण तलावाला १३१ .२४ कोटीची प्रशासकीय मंजुरी –ना. आशुतोष काळे

कोपरगाव/वेबटीम:- मागील काही वर्षापासून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला होता. शहरातील नागरिक खोट्या आश्वासनाला कंटाळले ह...

कोपरगाव/वेबटीम:-


मागील काही वर्षापासून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला होता. शहरातील नागरिक खोट्या आश्वासनाला कंटाळले होते. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ना. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील जनतेला दिलेला शब्द पूर्ण करून पहिल्या दोनच महिन्यात ५ नंबर साठवण तलावाच्या प्राथमिक स्वरूपातील खोदाई  कामाला सुरुवात करून काही महिन्यातच हे काम पूर्ण देखील करून दाखविले. व पुढील कामासाठी व वितरण व्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या १३१.२४ कोटी निधीला देखील महाविकास आघाडी सरकारकडून प्रशासकीय मंजुरी मिळवून कोपरगाव शहरातील नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण करून दाखविला आहे.



             संधी द्या, तुमचा पाणीप्रश्न सोडवून दाखवितो असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या साक्षीने ना. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील विधानसभेच्या निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभेत संगीतले होते. त्या शब्दावर विश्वास ठेवून २०१९ ला मतदार संघासह शहरातील सुज्ञ मतदारांनी ना. आशुतोष काळेंना विधानसभेत पाठविले. त्यांनी पण दिलेल्या शब्द पूर्ण करण्यासाठी वारंवार शरदचंद्रजी पवार यांची भेट घेवून ५ नंबर साठवण तलावाला निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करीत होते.आपल्या समोर कोपरगाव शहरातील जनतेला ना. आशुतोष काळे यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली आहे. याची पक्की आठवण शरदचंद्रजी पवार यांना होती. त्यामुळे ५ नंबर साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांची देखील अनमोल मदत झाली असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.  


            काही वर्षापासून कोपरगावच्या नागरिकांना पाणी प्रश्न भेडसावत आहे. त्याचा परिणाम शहरातील व्यवसायावर होत असल्यामुळे बाजारपेठ देखील आर्थिक अडचणीत आली होती. मात्र शहराचा पाणी प्रश्न सोडवायचा असेल तर साठवण क्षमता वाढविणे व सुधारित वितरण व्यवस्था अत्यंत महत्वाची असल्याचे ना. आशुतोष काळेंच्या चाणाक्ष बुद्धीने हेरले होते. त्यामुळे २०१९ च्या पूर्वीपासून ५ नंबर साठवण तलावासाठी त्यांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला आहे कोपरगाव शहरातील जनतेला ठावूक आहे मात्र सत्ता नसल्यामुळे त्यांचे हात बांधलेले होते.परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेली संधी आणि राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मागील अनेक वर्षापासुनचा कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात ना. आशुतोष काळे यांना यश आले आहे. त्याबद्ल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, नगरविकास मंत्री ना. एकनाथजी शिंदे, नगरविकास राज्य मंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांचे कोपरगाव शहरातील जनतेच्या वतीने आभार मानले आहे.


   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत