श्रीरामपूर(वार्ताहर):- तालुक्यातील माळवाडगाव चे लोकनियुक्त सरपंच व लक्ष्मीमाता मिल्क चे चेअरमन बाबासाहेब भाऊसाहेब चिडे यांना राज्यस्तरीय आदर...
श्रीरामपूर(वार्ताहर):-
तालुक्यातील माळवाडगाव चे लोकनियुक्त सरपंच व लक्ष्मीमाता मिल्क चे चेअरमन बाबासाहेब भाऊसाहेब चिडे यांना राज्यस्तरीय आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार जाहीर झाला आहे.
राज्याचे उपसभापती निलमताई गोऱ्हे,माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, बांधकाम राज्य मंत्री दत्तात्रय भरणे,व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालिताई चाकणकर यांचे हस्ते पुणे येथे सोमवारी या पुरस्कारचे वितरण होणार आहे.
शेतकरी कुटुंबातील बाबासाहेब चिडे यांनी एक यशस्वी उद्योजक म्हणून लौकिक मिळवल्यानंतर माळवाडगाव च्या जनतेने त्यांच्या वर सरपंच पदाची जबाबदारी सोपवली व चार वर्षे च्या काळात चिडे यांनी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन गवतील मूलभूत सुविधाना प्राधान्य देवून गावातील रस्ते, लाईट ,पिण्याचे पाणी व आरोग्य या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देऊन गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे.
या कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श लोकप्रतिनिधी हा पुरस्कार मिळाला आहे.हा सन्मान केवळ माझा सन्मान नसून संपूर्ण माळ वाड गाव च्या ग्रामस्थांचा असल्याची प्रतिक्रिया सरपंच बाबासाहेब चिडे यांनी व्यक्त केली आहे. बाबासाहेब चिडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत