राहुरी फॅक्टरी/प्रतिनिधी:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आंबेडकर गटाच्या राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील शहराध्यक्षपदी शुभम मकासरे यांची त...
राहुरी फॅक्टरी/प्रतिनिधी:-
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आंबेडकर गटाच्या राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील शहराध्यक्षपदी शुभम मकासरे यांची तर उपाध्यक्षपदी सागर राजगुरू यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
आरपीआय आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यात पदाधिकारी निवडी व कार्यकर्त्यांचे संघटन वाढविण्याचे काम जोमाने सुरू आहे.
जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांचा उपस्थितीत वांबोरी शहराध्यक्ष शुभम मकासरे व उपाध्यक्षांना सागर राजगुरू यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले
यावेळी दक्षिण जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे,जिल्हा कार्याध्यक्ष पापाभाई बीवाल,उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राकेश कापसे, जिल्हा सचिव राजन ब्राह्मणे, राहुरी तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे, दिनेश पलघडमल आदींसह कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत