राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी परिसरातून गेल्या दोन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पोलीस प्रशासनाला तपास ला...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी परिसरातून गेल्या दोन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पोलीस प्रशासनाला तपास लागला असून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या अकोले तालुक्यातील कोतुळ येथील एकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून अल्पवयीन मुलीच्या जाब जबाबानंतर पुढील प्रकिया पोलिसांनी सुरू केली आहे.
राहुरी फॅक्टरी येथील १७ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, सदर अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा फोन बंद असल्याने तपास कामात अडथळा निर्माण होत होता.
अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीच्या शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीला एका नंबर वरून फोन आला. त्या फोनवर अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचे संभाषण झाले. ही अपहरण झालेल्या मुलीच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी तो मोबाईल ताब्यात घेऊन पोलिसांकडे दिला.
पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास सुरू केला त्यानुसार सदर लोकेशन अकोले तालुक्यातील कोतूळ येथील मिळाले.
तराहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल दिनकर गर्जे, महिला पोलीस नाईक श्रीमती गुंजाळ आदी कोतुळ येथे रवाना झाले.
लोकेशनच्या आधारे पोलीस कर्मचारी कोतूळ येथे पोहोचताच अपहरण झालेली मुलगी आणि अपहरण करणारा संकेत पांडुरंग खरात( वय २४ रा.कोतुळ, ता. अकोले) मिळून आले.
दोघांनाही राहुरी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते.
दरम्यान राहुरी फॅक्टरी येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अद्याप तिचा तपास लागला नाही तर आज राहुरी खुर्द येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत