एकल कलाकार मानधन निवड समिती सदस्यपदी राष्ट्रीय भारूडकार हमीद सय्यद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

एकल कलाकार मानधन निवड समिती सदस्यपदी राष्ट्रीय भारूडकार हमीद सय्यद

  अहमदनगर(वेबटीम) महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग एकल कलाकार मानधन निवड समिती अहमदनगर सदस्यपदी राष्ट्रीय भारूडकार हमीद अमीन सय्यद यां...

 अहमदनगर(वेबटीम)



महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग एकल कलाकार मानधन निवड समिती अहमदनगर सदस्यपदी राष्ट्रीय भारूडकार हमीद अमीन सय्यद यांची निवड करण्यात आली.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य  विभाग महाराष्ट्र शासन एकल कलाकार मानधन निवड समिती अहमदनगर अशासकीय सदस्यपदी राष्ट्रीय भारूडकार हमीद अमीन सय्यद यांची निवड झाली आहे त्यांना निवडीचे पत्र समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले,समितीचे सदस्य सचिव तथा अति.मुख्यकार्यकारी अधिकारी जि प अहमदनगर संभाजी लांगोरे साहेब,यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी समितीचे सदस्य तथा जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे साहेब,समितीचे सदस्य तथा जिल्हा माहिती अधिकारी डॉ रवींद्र ठाकूर, सदस्य पत्रकार भगवान राऊत सर, डॉ श्याम शिंदे, रियाज पठाण,आरती जाधव मॅडम आदी उपस्थित होते.


 हमीद सय्यद आकाशवाणी दूरदर्शन चे मान्यताप्राप्त  बी- हाय ग्रेड कलाकार असून  संत एकनाथ महाराज यांच्या भारुडाद्वारे समाजप्रबोधन करत आहेत भारत सरकार माहीती आणि प्रसारण मंत्रालय प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे, महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय पंजीकृत जय हिंद लोककला मंचच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना व सामाजिक विषयावर लोककलेद्वारे प्रबोधन करत आहेत शासनाने अनेक पुरस्काराने त्यांना गौरविले आहे याच कार्याची दखल घेऊन त्यांची शासनाने या समितीवर निवड केली आहे 

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण राज्यात लॉककडाऊन होता या काळात सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील संघटित व असंघटित क्षेत्रातील प्रयोगात्मक कलाप्रकारातील विविध कलाकार ज्यांचे उपजीविकेचे  साधन केवळ सांस्कृतिक कार्यक्रम व कला सादर करणे आहे त्यांची आर्थिक कुचंबना झाली आशा संघटित व असंघटित क्षेत्रातील प्रयोगात्मक कलाप्रकारातील कलाकारांना शासनाच्या वतीने एकरकमी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे उदा.तमाशा,शाहीर,भारुडकार,खडी गमत,वासुदेव,पोतराज,नाट्यकलाकार,चित्रकथी,बहुरूपी, कीर्तनकार, प्रबोधनकार,स्थानिक ठिकाणी आढळणारे प्रयोगात्मक कलाप्रकारातील केवळ कलेवर उदरनिर्वाह असणारे आर्थिक दृष्ट्या दुर्बल कलाकार यांना ही एकरकमी आर्थिक मदत देण्यात येणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत